एक्स्प्लोर

Shraddha Kapoor Eetha: 'विठाबाईं'च्या भूमिकेत पाहून श्रद्धा कपूरचा भाऊ झाला भावुक; 'ईठा'चा टीझर शेअर करत बहिणीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

Shraddha Kapoor Eetha Teaser: श्रद्धा कपूरचा 'ईठा' सिनेमाचा टीझर रिलीज. भाऊ सिद्धांत कपूर म्हणाला..

Shraddha Kapoor Eetha: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या 'ईठा' (Eetha) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील टीझर नुकताच सोशल मीडियात (Social Media) लीक झाला. या सिनेमाचा टीझर थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून या सिनेमाची आणि श्रद्धा कपूरची विशेष चर्चा होत आहे.   या सिनेमात श्रद्धा कपूरने तमशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांची भूमिका साकारली.   विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या कारकि‍र्दीत बरेच चढ उतार पाहिले आहेत.  त्यांच्या आयुष्यातील जीवनपट या सिनेमातून दाखवण्यात आला आहे.  विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या सिनेमात विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका उत्तमरित्या वठवली आहे.  

बॉलिवूड सेलिब्रिटींनी श्रद्धा कपूरचं विशेष कौतुक केलं आहे.  यासह श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरनेही आपल्या बहिणीचं कौतुक केलं आहे.  त्यानं चित्रपटाचा टीझर आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला असून,  बहीण श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.  तसेच 'ईठा' हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली.  शुक्रवारी 'कॉकटेल 2' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 'ईठा' या सिनेमाचा टीझरही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला. 

'ईठा' या सिनेमाचा टीझर थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर सिद्धांतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.  तसेच स्टोरीवर लिहिले की, 'माझी लाडकी, बहीण.. माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रु आहेत'.. असं म्हणत त्यानं आपल्या बहिणीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.  यासह त्यानं आपल्या पोस्टमध्ये श्रद्धा कपूरलाही टॅग केलं आहे.  सिद्धांतची स्टोरी सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

'ईठा'  सिनेमाचा टीझर सोशल मीडियात व्हायरल (Shraddha Kapoor Eetha Teaser Siddhant Kapoor)

'ईठा' या सिनेमाचा टीझर सोशल मीडियात लीक झाला आहे. या सिनेमातून महान लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे.   श्रद्धा कपूरने या भूमिकेला विशेष न्याय दिला आहे.  टीझरमध्ये विठाबाई गरोदर असल्याचं दिसते. गरोदर असूनही  त्या रंगमंच सोडत नाहीत.  अढळ निष्ठेने ते रंगमंचावर आपली छाप पाडताना दिसतात. या सिनेमाचा टीझर पाहून  अंगावर काटा  आल्याशिवाय राहणार नाही.   

महाराष्ट्रातील लोककलाकार आणि लावणी नृत्यांगना स्व. विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म तमाशाच्या वातावरणात होतो आणि ते आपल्या कलेसाठी आयुष्य समर्पित करतात.   विठाबाई नारायणगावकर यांना आपल्या कारकि‍र्दीत विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे.  लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात आणखी किती कलाकार आहेत? हे लवकरच उघड होईल. दरम्यान, हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसूतीकळातही सादरीकरण, पाय थांबले नाही; 'ईठा' सिनेमाचा टीझर पाहून लेक भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
Kangana Ranaut On Gen Z: तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
Sushmita Mukherjee: 'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
Malaika Arora: मलायका अरोरा बिझनेसमनच्या प्रेमात; 19 वर्षांनी लहान जोडीदार का निवडला? 'या' व्यक्तिने उलगडलं गुपित
मलायका अरोरा बिझनेसमनच्या प्रेमात; 19 वर्षांनी लहान जोडीदार का निवडला? 'या' व्यक्तिने उलगडलं गुपित
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget