एक्स्प्लोर

'टॉक्सिक'मुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांचा मोठा निर्णय

अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होण्याची शक्यता होती.

Eetha Release Date Update: सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक: अ फेरीटेल फॉर ग्रोन-अप्स' (Toxic) या बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे 'टॉक्सिक' बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करेल, अशी चर्चा आहे. अशातच आता श्रद्धा कपूरच्या 'ईठा' (Eetha) या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार,'टॉक्सिक'सोबत होणारा बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी 'ईठा'ची रिलीज डेट बदलण्याचा विचार सुरू आहे. हा चित्रपट यापूर्वी 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार होता.

'ईठा' आणि 'टॉक्सिक'मध्ये होणार होती टक्कर

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा आणि लावणी सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित 'ईठा' या चित्रपटात श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मराठी लोककलेतील एका दिग्गज कलाकाराचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. दुसरीकडे, यशचा 'टॉक्सिक: अ फेरीटेल फॉर ग्रोन-अप्स' हा चित्रपट 26 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होण्याची शक्यता होती.

रिलीज डेट बदलण्याची तयारी?

बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार,'ईठा'चे निर्माते मॅडॉक फिल्म्स चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याच्या विचारात आहेत.चित्रपट नियोजित तारखेपूर्वी प्रदर्शित करायचा की काही दिवस पुढे ढकलायचा, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मात्र,28 ऑगस्टलाच 'ईठा' प्रदर्शित होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. निर्माते लवकरच नव्या प्रदर्शन तारखेची अधिकृत घोषणा करू शकतात.

क्लॅश टाळण्यामागचं कारण काय?

ट्रेड विश्लेषकांच्या मते,'टॉक्सिक' आणि 'ईठा' या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची क्षमता आहे.अशा परिस्थितीत दोन्ही चित्रपट एकाच काळात प्रदर्शित झाल्यास प्रेक्षक विभागले जाऊ शकतात आणि दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः 'ईठा'ला महाराष्ट्रात सांस्कृतिक विषयामुळे मोठा प्रतिसाद मिळू शकतो.त्यामुळे अनावश्यक स्पर्धा टाळण्यासाठीच निर्माते रिलीज डेट बदलण्याचा विचार करत असल्याची चर्चा रंगली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir kapoor Angry On paps: 'खूप बोलतोयस तू ' रणबीर कपूरने पापाराझींवर भडकला, बोट दाखवत म्हणाला...; रामायणाच्या इव्हेंटनंतर काय घडलं? Video
'खूप बोलतोयस तू ' रणबीर कपूरने पापाराझींवर भडकला, बोट दाखवत म्हणाला...; रामायणाच्या इव्हेंटनंतर काय घडलं? Video
Bigg Boss fame Divya Shinde Arrest: 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेला अटक! 5 लाखांची खंडणी, जेष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, नेमकं घडलंय काय?
'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेला अटक! 5 लाखांची खंडणी, जेष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, नेमकं घडलंय काय?
Virender Sehwag Sara Gurpal: 'क्रिकेटर्स मला मेसेज करतात'; Reality शोमध्ये दाखवले चॅट, वीरेंद्र सेहवाग म्हणाले, 'म्हणून रन होत नाहीत...'
'क्रिकेटर्स मला मेसेज करतात'; Reality शोमध्ये दाखवले चॅट, वीरेंद्र सेहवाग म्हणाले, 'म्हणून रन होत नाहीत...'
OTT Trending Web Series: OTT वरची 7 एपिसोडची ही सायको थ्रिलर अजिबात चुकवू नका, रिलीज होताच 1 नंबरला होतेय ट्रेंड, ठासून भरलेला सस्पेन्स खिळवून ठेवेल
OTT वरची 7 एपिसोडची ही सायको थ्रिलर अजिबात चुकवू नका, रिलीज होताच 1 नंबरला होतेय ट्रेंड, ठासून भरलेला सस्पेन्स खिळवून ठेवेल
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget