एक्स्प्लोर

Tejaswini Kolhapure On IVF Struggles: प्रचंड त्रास, 1000 हून जास्त इंजेक्शन्स, शरीराचा आकारच बदलून गेलेला...; श्रद्धा कपूरची बहीण 'टेस्ट ट्यूब बेबी', आईनं IVF च्या असंख्य वेदना सहन करुन दिलेला जन्म

Tejaswini Kolhapure On IVF Struggles: आयव्हीएफ वेळी तिचा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलंय आणि हा काळ तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता, असं त्यांनी बोलताना सांगितलं. 

Tejaswini Kolhapure On IVF Struggles: नव्वदीचा काळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे (Actress Tejaswini Kolhapure) यांनी आपल्या आयव्हीएफ ट्रिटमेंटबाबत (IVF Treatment) धक्कादायक खुलासा केला आहे. पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांची धाकटी बहीण आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), सिद्धांत कपूर (Siddhanth Kapoor) यांची मावशी असलेल्या तेजस्विनी कोल्हापुरे यांनी सांगितलं की, तिचा आई होण्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. आयव्हीएफ (IVF) वेळी तिचा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलंय आणि हा काळ तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता, असं त्यांनी बोलताना सांगितलं. 

सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तेजस्विनी कोल्हापुरे यांनी खुलासा केला की, तिनं एकदा किंवा दोनदा नव्हे, तर तब्बल पाच वेळा आयव्हीएफ प्रक्रिया करून घेतली होती. तिनं या प्रक्रियेचं वर्णन अत्यंत वेदनादायक असं केलेलं आणि सांगितलेलं की, इंजेक्शनसाठी वारंवार क्लिनिकमध्ये जावं लागणं ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती. या प्रक्रियेसाठी प्रचंड मानसिक धैर्याची आवश्यकता असते, यावर तिनं भर दिला. तसेच, शक्य असल्यास वयाच्या 35 व्या वर्षापूर्वीच कुटुंब सुरू करण्याचं नियोजन करण्याचा सल्लाही तिनं महिलांना दिला.

"मी खूप काही सहन केलं, IVF ही अत्यंत कठीण प्रक्रिया आहे..." (Bollywood Actress IVF Struggle)

पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या की, "मी पाच वेळा आयव्हीएफ (IVF) प्रक्रियेतून गेलेय. मी याबद्दल मोकळेपणानं बोलते. या काळात मी खूप काही सहन केलं. आयव्हीएफ ही अत्यंत कठीण प्रक्रिया आहे. या ट्रिटमेंटची पहिली आणि दुसरी फेरी खूपच कठीण असते, तर तिसरी, चौथी आणि पाचवी फेरी तुलनेनं सोपी होते. क्लिनिकमध्ये जाण्यासाठी आणि इंजेक्शन घेण्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप खंबीर राहावं लागतं. ही अत्यंत वेदनादायी प्रक्रिया आहे. मी बऱ्याच मोठ्या वयात मूल होऊ देण्याचा निर्णय घेतलेला. माझा सल्ला असा आहे की, कृपया वयाच्या 35 व्या वर्षापूर्वीच मूल होऊ द्या..."

"मी 1,000 हून अधिक इंजेक्शन्स घेतलीत..." (Bollywood Actress Tejaswini Kolhapure IVF Struggle)

तेजस्विनी कोल्हापुरे पुढे बोलताना म्हणाल्या की, "याचा माझ्यावर शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर मोठा परिणाम झाला. तेव्हाची मी आणि आताची मी, यात खूप मोठा फरक आहे. मानसिकदृष्ट्या मी पूर्वीपेक्षा अधिक खंबीर झालेय. शारीरिकदृष्ट्या, इतक्या मोठ्या संख्येनं इंजेक्शन्स घेतल्यामुळे माझ्या शरीराच्या आकारात बदल झाला. मी 1,000 हून अधिक इंजेक्शन्स घेतली. सहसा, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर इंजेक्शन्स देणं थांबवलं जातं, पण माझ्या बाबतीत तसं घडलं नाही. म्हणूनच मला ही प्रक्रिया पाच वेळा करावी लागली. पाचव्या प्रयत्नात मला यश मिळालं. या दरम्यान, माझा दोनदा गर्भपात झाला. अशा वेळी माणूस मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तो काळ खूप कठीण होता..."

लग्नानंतर सुमारे आठ वर्षांनी वेदिकाचा जन्म झाला (Bollywood Actress Struggle)

तेजस्विनी कोल्हापुरे यांचं लग्न सिनेनिर्माते आणि अभिनेते पंकज सारस्वत यांच्याशी झालंय. लग्नानंतर सुमारे आठ वर्षांनी या जोडप्यानं आपली मुलगी वेदिकाचं स्वागत केलं. वेदिकाचा जन्म 30 जानेवारी 2015 रोजी झाला. तेजस्विनी कोल्हापुरे म्हणजे, पद्मिनी कोल्हापुरे आणि शिवांगी कोल्हापुरे यांची धाकटी बहीण. शिवांगी कोल्हापुरे यांनी बॉलीवूड अभिनेते शक्ती कपूर यांच्याशी लग्न केलं. या नात्यामुळे तेजस्विनी कोल्हापुरे ही श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर यांची मावशीही लागते.

टीव्ही आणि फिल्म्समध्ये केलंय खूप काम 

तेजस्विनी कोल्हापुरे यांच्या सिनेसृष्टीतील कामाबाबत बोलायचं झालं तर, त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. त्यांच्या करिअरची सुरुवात 'मुझे चांद चाहिए' या मालिकेपासून झाली. याव्यतिरिक्त त्यांनी थिएटरमध्ये 'द मॅजिक पिल' आणि 'द ग्रेजुएट' यांसारख्या नाटकांमध्ये काम केलंय. त्यांचा पहिला सिनेमा अनुराग कश्यप यांचा 'पांच' होता, जो 2003 मध्ये रिलीज झालेला. त्यानंतर 'रावण', 'अगली' आणि 'दादी की शादी' यांसारख्या सिनेमांमध्ये दिसलेल्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Actress Shubha Godbole Fight With Cancer: मेधा मांजरेकरांनंतर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान; उपचारावेळचे गळालेले केस अन् त्यानंतरचे 'केमो कर्ल्स' केले फ्लॉन्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget