Sher Shivraj : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या 'पावनखिंड'  आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच त्यांचा 'शेर शिवराज' (Sher Shivraj) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा नुकताच धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान ठरावा असा अफजलखान वधाचा अध्याय 22 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पहायला मिळणार आहे. 


अभिनेता चिन्मय मांडलेकर हा  'शेर शिवराज'  या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी हे या चित्रपटामध्ये अफझल खानाची भूमिका साकारणार आहेत. 



काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी कॅप्शनमध्ये दिग्पाल यांनी लिहिले, 'होरात्र अन्याय-अत्याचार सहन करत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला.दाही दिशा थरथरल्या, काळ पुरुषाच्याही कानठळ्या बसल्या आणि प्रचंड गर्जना करत प्रकटला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह. 'शेर शिवराज' 22 एप्रिल 2022' 


मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान!


‘शेर शिवराज' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या चित्रपटात घडणार आहे.


हेही वाचा :