हैदराबाद : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं. पण दारुच्या नशेत लग्न केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तुम्ही वाचलं ते बरोबर आहे. तेलंगणात नुकतंच दोन पुरुषांनी मद्यपानानंतर 'हाय' झाल्यावर लग्न केलं. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जोगीपेट इथल्या 21 वर्षीय तरुणाने मेडक जिल्ह्यातील 22 वर्षीय रिक्षाचालकाशी लग्न केलं. काही दिवसांनी त्यांचं हे गुपित समोर आलं. वादावादी झाली, प्रकरण पोलिसात गेलं मग आपसात चर्चा करुन दहा हजारांच्या पोटगीनंतर प्रकरण मिटलं आणि दोघे वेगळे झाले. या लग्नाची सध्या तेलंगणात चांगलीच चर्चा आहे.
डुमापलापेट गावातील एका ताडीच्या दुकानात दोघे एकमेकांना भेटले आणि नंतर त्यांची मैत्री झाली. यानंतर ते दारु पिण्यासाठी अनेकदा भेटू लागले. 1 दोघांनी लग्न केलं. यावेळी दोघेही दारुच्या नशेत होते. जोगीनाथ गुट्टा मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळा आटोपल्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले.
काही दिवसांनी जोगीपेठ येथील एका तरुणाने रिक्षाचालकाच्या घरी जाऊन दोघांच्या लग्नाची माहिती त्याच्या पालकांना दिली आणि हे गुपित उघड झालं. त्याने रिक्षाचालकाच्या पालकांना आपल्याला त्यांच्याकडे राहण्याची परवानगी द्यावी, कारण त्याच्याकडे राहण्यासाठी जागा नाही अशी विनंती केली. विनवणी करुनही रिक्षाचालकाच्या पालकांनी त्या व्यक्तीला घरात येऊ दिलं नाही. वादानंतर जोगीपेट इथला तरुण रिक्षाचालकाच्या पालकांची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला. त्याने रिक्षाचालकापासून दूर राहण्यासाठी संबंधित तरुणाने त्याच्या पालकांकडे एक लाख रुपयांची मागणीही त्यांनी केली.
यानंतर दोघांनीही हे प्रकरण पोलिसांसमोर नेण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामुळे दोन्ही पक्षांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी आपापसात चर्चा करुन प्रश्न सोडवला. वाटाघाटीनंतर, जोगीपेट इथल्या व्यक्तीने रिक्षाचालकाच्या कुटुंबाकडून दहा हजार रुपयांचं वनटाईम सेटलमेंट करण्यास सहमती दर्शवली. यानंतर दोन्ही पक्षांच्या संमतीने ते वेगळे झाले.
हेही वाचा