Ranbir-Alia Wedding : बॉलिवूडचं स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच लग्नबंधनात अडकणार असून त्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. चेंबूर येथील आरके स्टुडिओचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संपूर्ण स्टुडिओला रोषणाई करण्यात आली आहे. स्टुडिओ इमारतीसह झाडांवर या लाईट्स लावण्यात आल्या आहेत.
आरके स्टुडिओसह रणबीर कपूरच्या घराचा कृष्णराज बंगलाही आज सकाळी सजवण्यात आला आहे. खरंच आलिया-रणबीरचं लग्न होत आहे की, नाही याला अद्याप कुटुंबातील कोणत्याही सदस्याने दुजोरा दिलेला नाही. परंतु, आज सकाळपासून घरांवर केलेली सजावट पाहता लग्नाची तयारी सुरू झाली आहे, असे म्हणता येईल.
याआधी रविवारी, रणबीर कपूरचे वांद्रे येथील नवीन बांधकाम सुरू असलेले घर देखील रोषणाईने सजले होते. सध्या बांधकाम सुरू असलेल्या ‘कृष्णा राज’ बंगल्याच्या अनेक व्हिडीओंमध्ये कामगार एलईडी स्ट्रिंग लाईट्सने बंगला सजवताना दिसत आहेत. बांधकाम कुठवर आलंय हे तपासण्यासाठी रणबीर, आलिया आणि नीतू कपूर यांनी यापूर्वी अनेकदा या ठिकाणी भेट दिली होती.
सर्वांना माहीत आहे की, रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली असून, प्रत्येक दिवसागणिक लग्नाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. पाहुण्यांच्या यादीपासून ते स्थळापर्यंत सर्वच गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
तारखेची अद्याप पुष्टी झालेली नसली, तरी यापूर्वी रणबीरने स्वतः लग्नाबाबत बोलण्यास होकार दिला होता. रणबीर आणि आलिया 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. त्याच वेळी, या जोडप्याच्या लग्नाचे इतर सोहळे 14 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. लग्नसोहळा सुरू होण्यापूर्वी दोघांची घरे सजवली जाणार आहेत. लग्नासाठी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले जात आहे. त्याचबरोबर लग्नानंतर आलिया आणि रणबीर मित्र आणि इंडस्ट्रीतील लोकांना ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत. रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. 2018 मध्ये सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये या दोघांनी एकत्र उपस्थिती दर्शविली होती.
हेही वाचा :
- Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध स्वतःच्या आईला घराबाहेर काढणार? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!
- Alia Bhatt,Ranbir Kapoor : रणबीरची होणारी 'दुल्हनिया' आलियाकडे भारताचं नागरिकत्व नाही; मुंबईत जन्म पण...
- Dasvi Twitter Review : अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ला प्रेक्षकांनी केलं ‘पास’! सोशल मीडियावरही चित्रपटाची हवा!