Adipurush : आज (10 एप्रिल) संपूर्ण देश ‘रामनवमी’चा (Ram Navami)  सण साजरा करत आहे. या खास प्रसंगी, साऊथ सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुप्रतिक्षित चित्रपट 'आदिपुरुष’चे (Adipurush) दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये भगवान रामाच्या अवतारामध्ये दिसणार्‍या प्रभासचे वेगवेगळे लूक दाखवण्यात आले आहेत. ओम राऊतच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.


ओम राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये भगवान रामाच्या अवतारामध्ये दिसणाऱ्या प्रभासचे वेगवेगळे लूक दाखवण्यात आले आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि चाहत्यांनी बनवलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटाचे हे पोस्टर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


पहा पोस्ट :



ओम राऊत यांनी या व्हिडीओसोबत खास कॅप्शनही लिहिले आहे. 'उफनता वीरता का सागर, छलकती वात्सल्य की गागर। जन्म हुआ प्रभु श्री राम का, झूमे नाचे हर जन घर नगर। बुराई पर अच्छाई की जीत का जश्न।', असे प्रभू श्रीरामाचे गुणगाण या कॅप्शनमधून करण्यात आले आहे.


'आदिपुरुष' हा प्रभासचा बिग बजेट चित्रपट असून, तो 12 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत, तर क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारणार आहे.


प्रभासच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो नुकत्याच रिलीज झालेल्या 'राधे श्याम' या चित्रपटात दिसला होता. 'आदिपुरुष' या चित्रपटाव्यतिरिक्त तो आता 'सालार' आणि 'प्रोजेक्ट के' या चित्रपटात देखील झळकणार आहे.


हेही वाचा :