मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आता सीबीआयने सगळा तपास ताब्यात घेतला आहे. कोर्टाने आदेश दिल्या दिल्या सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली. आल्या आल्या त्यांनी अनेक गोष्टींचा तपास करायला घेतला. त्यातली मुख्य गोष्ट होती ती सुशांतचा मृत्यू रिक्रिएट करणं. म्हणजे त्याचं नाट्यरुपांतर करून पाहाणं. सीबीआय जोशात आलेली बघून अभिनेता शेखर सुमन आनंदून गेला आहे. तपास असा असतो असं त्यानं आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. सीबीआय आता एकदम अॅक्शनमध्ये आली आहे. तपासाच्या दिशेनं जोरदार असा त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. असा तपास करायचा असतो. मला आशा आहे की सुशांतच्या मारेकऱ्यापर्यंत ते लवकरच पोचतील असं ट्विट त्याने केलं आहे. शेखर सुमननेच सगळ्यात सुरूवातीला सुशांतचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर अत्यंत मोजके लोक सुशांतच्या घरी जाऊन आले. त्यात नाना पाटेकर आणि शेखर सुमन यांचा समावेश होतो. शेखर सुमन यांनी या भेटीनंतर लगेच पत्रकार परिषदही घेतली होती. त्या परिषदेवेळी शेखर सुमन यांनी सुशांतसिह राजपूतची हत्या झाल्याचा दावा केला होता. इतकंच नव्हे, तर सुशांतने कसे एका महिन्यात 50 सीमकार्ड बदलले होते हेही सांगितलं होतं. त्यावेळी बिहारचे विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव आणि संदीप सिंग त्यावेळी उपस्थित होते. सीबीआयने तपासाचा वेग वाढवला  सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. काल सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयची टीम सीन ऑफ क्राईम रिक्रिएट करणार आहे. यासाठी सीबीआयने सर्व सामानही सोबत नेलं होतं.  यावेळी सीबीआयने मुंबई पोलिसांच्या टीमला बाहेर उभं राहण्यास सांगितलं होतं, अशी माहिती मिळत आहे. काल सीबीआय अधिकार्‍यांकडून सुशांत राहत असलेल्या अपार्टमेंटची पाहणी केली. काही अधिकाऱ्यांनी इमारतीच्या शेवटच्या फ्लॅटवरील गच्चीवर जाऊन देखील संपूर्ण परिसराची पाहणी केली. सुशांत राहत असलेल्या खोलीत फॉरेन्सिक लॅब डॉक्टर्सही आले होते. सीबीआयच्या टीमसोबत यावेळी सिद्धार्थ पिठानी, दीपेश आणि नीरज हे देखील होते. घटना घडली त्यावेळी सिद्धार्थ, दीपेश आणि नीरज सुशांतसोबत उपस्थित होते. सीबीआयने 21 तारखेपासून या प्रकरणी आपला तपास सुरु केला. सीबीआयच्या टीमने सुशांतचा कूक नीरजची जवळपास 14 चौकशी केली. यावेळी 40 पानांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीची मागणी या प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकारण अजूनही सुरुच आहे. बिहारचे भाजप प्रवक्ते निखील आनंद यांनी दिशा-सुशांत यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीची मागणी केली आहे. निखील आनंत यांनी म्हटलं की, दीशा आणि सुशांतचा मृत्यू संशयास्पद आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या इशाऱ्यावरून मुंबई पोलीस हे प्रकरण बंद करण्याच्या मागे आहे. तसेच सुशांच्या मृत्यू प्रकरणातील संशयितांचं मुंबई पोलिसांशी असलेली जवळीक संशयास्पद आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या चौकशी मागणी निखील आनंद यांनी केली आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेचा मोठा खुलासा सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने मोठा खुलासा केला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 13 जूनच्या रात्री सुशांतच्या घराची लाईट बंद होती. फक्त किचनची लाईट सुरु होती. सुशांतच्या फ्लॅटमधील लाईट्स इतरवेळी रात्री उशिरापर्यंत सुरू असायच्या असंही या महिलेनं सांगितलं. महिलेने दावा केला की, 13 जूनच्या रात्री सुशांतच्या फ्लॅटमध्ये कोणत्याही प्रकारची पार्टी झाली नाही. या संपूर्ण घटनेत काहीतरी गडबड आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआय याप्रकरणी महिलेची आणखी चौकशी करत आहे. मात्र सीबीआय या महिलेची आजच चौकशी करणार नंतर चौकशी याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. संबंधित बातम्या