Shehnaaz Gill Flight: 'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
Shehnaaz Gill on Flight: शहनाज गिलच्या विमानाला टर्बुलन्स, अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल.

Shehnaaz Gill Video: शहनाज गिल (Shehnaaz Gill). बिग बॉस 13 (Bigg Boss 13) या रिॲलिटी शोनंतर तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. केवळ पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही तर, तिने बॉलिवूडमध्येही आपलं पाऊल ठेवलं. अभिनेत्री सोशल मीडियात (Social Media) प्रचंड सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अलीकडेच अभिनेत्रीने एक व्हिडीओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री घाबरली असल्याचं दिसत आहे. ज्यामुळे तिचे चाहते काहीवेळासाठी गोंधळले असल्याचं पहायला मिळालं. विमानात अचानक बसणाऱ्या धक्क्यांमुळे वातावरण थोडं भीतीदायक झाले होते. अभिनेत्रीसह इतर प्रवासी देखील घाबरले होते. पण सुखरूपपणे विमान लँड झाले. नेमकं घडलं काय? शहनाज गिल मध्येच ' वाहेगुरू, वाहेगुरू ' असं जप का करू लागली? पाहूयात.
शहनाज गिलचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Shehnaaz Gill Gets Scared During Flight)
शहनाज गिलने अलीकडेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात शहनाज विमानात प्रवास करत असल्याचं दिसत आहे. या विमानात काही बिघाड किंवा हवामानामुळे परिस्थिती थोडी बिकट झाली असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच शहनाज गिल ' वाहेगुरू वाहेगुरू ' असा जप करताना दिसत आहे. व्हिडीओवरून तुम्ही अंदाज लावू शकता की, या प्रवासात नेमकं काय घडलं असेल... व्हिडीओ शेअर करून अभिनेत्रीने ' आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो आहे. आम्ही सुरक्षितपणे उतरलो, याचा मला आनंद आहे. धन्यवाद वाहेगुरू ', असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
या घटनेनंतर शहनाज गिल प्रचंड घाबरली होती. पण सुरक्षित लँडिंगनंतर तिला दिलासा मिळाला. व्हिडीओच्या शेवटी अभित्री ' गणपती बाप्पा मोरया ' अस म्हणताना दिसत आहे. सध्या शहनाज गिलचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या फ्लाईटमध्ये शहनाज गिल प्रवास करत होती, त्याच फ्लाईटमधून तिचा भाऊ शहबाज बदेशाही प्रवास करत होता. अचानक टर्बुलेंस आल्यानंतर विमानातील सगळे प्रवासी घाबरले पण मुंबई एअरपोर्टमध्ये लँड केल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
शहनाज गिलने ही घटना लपवण्याऐवजी उघडपणे व्हिडीओ शेअर करून चाहत्यांबरोबर ही माहिती शेअर केली. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर सुदैवाने कोणतीही दुर्घटनेची माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























