Shashikala : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला (shashikala) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळाली. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून शशिकला या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. त्या आयुष्य देखील फिल्मी पद्धतीनं जगल्या. रिपोर्टनुसार, शशिकला यांचे वडील प्रसिद्ध बिझनेसमॅन होते. बालपणी त्या अतिशय आलिशान आयुष्य जगत होत्या. पण त्यानंतर मात्र त्यांना घडतर आयुष्य जगावं लागलं.
शशिकला यांच्या वडिलांना बिझनेसमध्ये लॉस झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये राहायला आले. तेव्हापासूनच शशिकला यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष सुरू झाला. तेव्हा शशिकला यांनी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी घरकाम करण्यास सुरूवात केली. बालपणापासूनच शशिकला यांना अॅक्टिंग आणि डान्सची आवड होती. त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अनेकांनी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला.
रिपोर्टनुसार, गायिका नूरजहाँ यांनी एकेदिवशी शशिकला यांना पाहिले. त्यानंतर नूरजहाँ यांनी झीनत या चित्रपटामध्ये शशिकला यांना काम करण्याची संधी दिली. झीनत 1947 मध्ये प्रदर्शित झालेला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. त्यानंतर शशिकला यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरूवात झाली.शशिकला यांनी 'सुजाता', 'आरती', 'अनुपमा', 'पत्थर और फूल', 'आई मिलन की बेला', 'गुमराह', 'वक्त', 'खूबसूरत', 'छोटे सरकार', अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 100 पेक्षा अधिक चित्रपटात शशिकला यांनी काम केले. 2005 पर्यंत त्या चित्रपटांत कामे करीत होत्या. 2007 मध्ये भारत सरकारने शशिकला यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरवले होते
हेही वाचा :
- Prithviraj : मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज'च्या सेटवरचा फोटो केला शेअर, राजकुमारी संयोगिताचा रॉयल लूक
- Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार
- Filmfare Awads Marathi 2021 : आज प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रंगणार 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha