Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतो आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. मानाचा पुरस्कार कोण पटकावणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
ग्रॅमी पुरस्कार सोहळा भारतीयांना कधी पाहता येणार?
64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये पार पडतो आहे. या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग भारतीय प्रेक्षकांना 4 एप्रिलला सकाळी 5:30 वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे. हा सोहळा प्रेक्षक Sony Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. पॉप बँड BTS ग्रॅमी अवॉर्ड्सच्या मंचावर थिरकणार आहे. या गटाला ग्रॅमी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. याशिवाय गागा, ब्रँडी कार्ली, जस्टिन बीबर, सिल्क सोनिकसह अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत.
ग्रॅमी पुरस्कार सोहळा जानेवारी महिन्यात पार पडणार होता. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. आधी हा सोहळा लॉस एंजेलिसमध्ये होणार होता. पण नंतर या सोहळ्याचे ठिकाण बदलण्यात आले. ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सर्वांचे लक्ष संगीतकार रिकी केजवर आहे. याआधीही रिकीला ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे.
संबंधित बातम्या
Filmfare Awads Marathi 2021 : आज प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रंगणार 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा'
Bharti Singh : कॉमेडी क्वीन भारती सिंहने दिली गोड बातमी, छोट्या पाहुण्याचे झाले आगमन
Mazya Navryachi Bayako : 'माझ्या नवऱ्याची बायको' आता येणार हिंदीत, प्रोमो आऊट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha