Will Smith :  काही ऑस्कर पुरस्कार 2022 (Oscars Awards 2022) सोहळा पार पडला. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथला (Will Smith) ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ऑस्कर सोहळ्यामध्ये एक घटना घडली. विल स्मिथनं  ख्रिस रॉक (Chris Rock) च्या कानशिलात लगावली. विल स्मिथच्या पत्नीबद्दल म्हणजेच  जॅडा स्मिथबद्दल  ख्रिस रॉकनं वक्तव्य केलं. त्यामुळे  विल स्मिननं  विलला कानाखाली मारली. या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आता हे थप्पड प्रकरण विल स्मिथला चांगलचं महागात पडलेलं दिसत आहे. फास्ट अँड लूज (Fast and Loose)या विल स्मिथच्या चित्रपटाबद्दल नेटफ्लिक्स (Netflix)नं मोठा निर्णय घेतला आहे. 


नेटफ्लिक्सनं विल स्मिथच्या फास्ट अँड लूज या चित्रपटाचे शूटिंग थांबवलं आहे. रिपोर्टनुसार, ऑस्कर सोहळ्याच्या दोन आठवड्यानंतर दिग्दर्शक  डेव्हिड लीच (David Leitch) देखील फास्ट अँड लूज हा चित्रपट सोडून दिला आहे. डेव्हिड लीच  यांनी विल स्मिथच्या या चित्रपटाला नकार देऊन  रायन गॉस्लिंगच्या फॉल गाय चित्रपटाच्या निर्मितीसाठी  यूनिवर्सल पिक्चर्ससोबत काम करण्याचा निर्णय घेतला. आता नेटफ्लिक्सनं देखील या चित्रपटाच्या निर्मिती माघार घेतली आहे. 


'किंग रिचर्ड्स' चित्रपटासाठी विल स्मिथला मिळाला ऑस्कर
विल स्मिथचा 'किंग रिचर्ड्स' हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामावर आधारित आहे. चित्रपटाचे कथानक टेनिसपटू सेरेना, व्हीनस विल्यम्सचे वडील आणि प्रशिक्षक रिचर्ड विल्यम्स यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विल स्मिथनं या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha