Shakira : अखेर ‘वाका वाका गर्ल’ शकीराने मोडलं 12 वर्षांचं नातं! अधिकृतरीत्या केलं जाहीर
Shakira, Gerard Pique : पॉप स्टार शकीरा (Shakira) आणि तिचा जोडीदार स्पॅनिश फुटबॉल खेळाडू जेरार्ड पिक(Gerard Piqué) यांनी ते वेगळे होत असल्याची घोषणा केली आहे.

Shakira, Gerard Pique : पॉप स्टार शकीरा (Shakira) आणि तिचा जोडीदार स्पॅनिश फुटबॉल खेळाडू जेरार्ड पिक(Gerard Piqué) यांनी ते वेगळे होत असल्याची घोषणा केली आहे. दोघांनी शनिवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. शकीराच्या पीआर फर्मने जारी केलेल्या निवेदनात दोघांनी सांगितले की, ‘आम्ही वेगळे होत आहोत, हे सांगताना आम्हालाही दुःख होत आहे.’ शकीरा आणि जेरार्ड मागील 12 वर्षांपासून एकत्र होते, मात्र, त्यांनी लग्न केले नव्हते.
या निवेदनात त्यांनी म्हटले की, ‘आमच्या मुलांचे हित ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तेव्हा, तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी आमची इच्छा आहे. आम्हाला समजून घेतल्याबद्दल आभारी आहे.’ शकीरा आणि जेरार्ड यांना दोन मुलं देखील आहेत. मनोरंजन आणि क्रीडा विश्वात चर्चेत असणारी ही जोडी वेगळी झाल्याने त्यांचे चाहतेही दुःखी झाले आहेत.
नेमकं काय झालं?
नुकतीच फुटबॉलपटू जेरार्ड पिक आणि शकीरा यांच्या नात्यात दुरावा आल्याची माहिती समोर आली होती. शकीरा आणि जेरार्ड ही जोडी 2010पासून एकत्र आहे. या जोडीला दोन मुलंही आहेत. मात्र, आता जेरार्डने शकीराची फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. इतकचं नाही तर, दोघेही लवकरच वेगळे होणार असल्याचेही म्हटले जात होते, जे अखेर खरे ठरले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून जेरार्ड त्याची जोडीदार शकीरापासून वेगळा राहत होता. शकीराने काही आठवड्यांपूर्वी जेरार्डला एका महिलेसोबत पकडले होते. प्रेमात फसवणूक झाल्याचं कळताच शकीराने आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला.
अशी जुळली होती जोडी
2010च्या फिफा विश्वचषकाचे अधिकृत गाणे ‘वाका-वाका’ दरम्यान शकीरा आणि जेरार्ड यांची पहिली भेट झाली होती. शकीरानेच ‘वाका-वाका’ या गाण्याला आवाज दिला होता. तसेच, या गाण्यात फुटबॉलपटू जेरार्ड पिकही दिसला होता. शकीरा जेरार्डपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. शकीराचा जन्म 1977 मध्ये कोलंबियामध्ये झाला होता, तर जेरार्ड पिकचा जन्म 1987 मध्ये बार्सिलोना, स्पेनमध्ये झाला होता. शकीरा आणि जेरार्ड यांना दोन मुले आहेत. मात्र, या दोघांनी अद्याप विवाह केलेला नाही. शकीराने 2013 मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. दोन वर्षांनंतर 2015 साली त्यांना दुसरा मुलगा झाला. फोर्ब्सच्या जगातील सर्वात ‘पॉवरफुल कपल’ यादीत शकीरा आणि जेरार्कचे नाव सामील होते.
हेही वाचा :
Shakira, Gerard Piqué : जेरार्ड पिककडून प्रेमात धोका! पॉपस्टार शकीरा मोडणार 12 वर्षाचं नातं
Before You Go
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा






















