Shahrukh Khan Dance Viral: बॉलिवूड किंग खान पठाणवर थिरकला, आयकॉनिक स्टेप करताना नेटकरी चेकाळले, सोशल मिडियावर Viral
दुबईमध्ये रविवारी त्याचा मुलगा आर्यन खानच्या स्ट्रीटवेअर ब्रँडच्या लाँचिंगला तो उपस्थित हेाता.
![Shahrukh Khan Dance Viral: बॉलिवूड किंग खान पठाणवर थिरकला, आयकॉनिक स्टेप करताना नेटकरी चेकाळले, सोशल मिडियावर Viral Shahrukh Khan Dance Viral Bollywood King Khan dance on Pathan titletrack in Dubai Aaryan khan DYAVOL event Viral on Social Media Shahrukh Khan Dance Viral: बॉलिवूड किंग खान पठाणवर थिरकला, आयकॉनिक स्टेप करताना नेटकरी चेकाळले, सोशल मिडियावर Viral](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/28/fe12160e77ab06ea901f02feb4e98bf017300912351231063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shahrukh Khan Dance Viral : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान कायमच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेचा विषय असतो.आता दुबईतल्या एका कार्यक्रमात आपल्या आयकॉनिक थ्रिलर पठाण या ब्लॉकबस्टर गाण्यावर थिरकत त्यानं कार्यक्रम गाजवल्याचं दिसतंय. सोशल मिडियावर चाहत्यांनी शाहरुखच्या नृत्याचे व्हिडिओ शेअर करत आपली पसंती दर्शवली आहे. दुबईमध्ये रविवारी त्याचा मुलगा आर्यन खानच्या स्ट्रीटवेअर ब्रँडच्या लाँचिंगला तो उपस्थित हेाता. राखाडी रंगाच्या ड्रेस आणि जॅकेट अशा लूकमध्ये त्यानं पठाणच्या टायटलट्रॅकच्या सिग्नेचर स्टेप करत चाहत्यांना खुश केल्याचं दिसलं. यावेळी चाहत्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसलं.
आर्यन खानच्या D' YAVOL ब्रँडच्या कार्यक्रमात उडवली धमाल
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या लक्झरी स्ट्रीटवेअर ब्रँड D'YAVOL या ब्रँडच्या लाँचिंग सोहळ्यात शाहरुखनं आपल्या आयकॉनिक गाण्यावर नाचत धमाल उडवून दिली. यावेळी उपस्थितांमध्ये गौरी खान आणि त्याची मुलगी सुहानाही उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना अभिवादन करताना त्यानं पठाणच्या टायटलट्रॅकवर भन्नाट डान्स केला. या डान्सचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर फिरत आहेत.
From singing to grooving on Jhoome Jo Pathaan, King Khan leaves everyone breathless—he’s impossible not to adore! ♥️✨@iamsrk#ShahRukhKhan #SRK #KingKhan #DYAVOLAfterDarkDXB #Dyavol #JhoomeJoPathaan pic.twitter.com/jIZLY07J2R
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) October 27, 2024
यावर चाहत्यांनी शाहरुखला चिअर केल्याचं दिसलं. नेटकऱ्यांनी शाहरुखच्या डान्सला डोक्यावर घेतलं आहे. सोशल मिडियावर शाहरुखची एकच चर्चा होत आहे.
Exclusive: #ShahRukhKhan dancing on Jhoome jo Pathaan at SKY 2.0 dubai night. His energy is beyond imagination. pic.twitter.com/z6D2zcUKtR
— 😎Sourav Srkian Das😎 (@SrkianDas04) October 28, 2024
आर्यन खानच्या या ब्रँड लाँचिगच्या कार्यक्रमातले फोटोही सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. यावेळी त्याने पांढरा टीशर्ट त्यावर जॅकेट असा लूक केला होता. आर्यन खान सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोंमध्ये पांढऱ्या टी-शर्टमध्ये चाहत्यांसोबत पोझ देताना दिसला. त्याची आई, इंटिरियर डिझायनर-चित्रपट निर्माती गौरी खान आणि बहीण अभिनेत्री सुहाना खान यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शाहरुख केवळ आर्यनच्या करिअरलाच नाही तर त्याची मुलगी सुहानालाही प्रमोट करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)