एक्स्प्लोर

'दोन पुरूष होते अन् मी कपड्यांशिवाय..' इंटिमेट सीन करतानाचा अनुभव कसा असतो? प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री म्हणाली..

Actress Sayani Gupta Shares Her Experience: सयानी गुप्ताने इंटिमेट सीनबाबत अनुभव शेअर केला. सेटवरील वातावरण व्यावसायिक असल्याचं केलं स्पष्ट.

Actress Sayani Gupta Shares Her Experience: सध्या आपण अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये इंटिमेट सीन्स पाहिले असतील. जेव्हा प्रेक्षक चित्रपट किंवा वेब सिरीजमधील इंटिमट सीन्स पाहतात, तेव्हा त्यांना या सीन्सच्या संबंधित अनेक प्रश्न पडतात. असे क्षण कसे चित्रीत केले जातात? हे सीन्स शूट करताना कलाकारांना विचित्र वाटत नाही का? इंटिमेट सीन्स शूट करत असताना कलाकारांच्या मनात भीती तयार होत नाही का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निश्चितच येतात. बऱ्याचदा इंटिमेट सीन करत असताना कलाकारांच्या मनात एक दडपण असतं. पण असे सीन शूट करताना सेटवर नेमकं वातावरण कसं असतं? याबाबत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. याआधीदेखील अनेक अभिनेत्रींनी इंटिमेट सीन करतानाचा अनुभव शेअर केला आहे. नुकतंच सयानीने इंटिमेट सीन करतानाचा अनुभव शेअर केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sayani G (@sayanigupta)

इंटिमेट सीनबाबत सयानी गुप्ता नेमकं काय म्हणाली?

अभिनेत्री सयानी गुप्ता आपल्या बोल्ड सीन्ससाठी ओळखली जाते. तिनं आतापर्यंत अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तिनं ऑनस्क्रीनमध्ये अनेक इंटिमेट सीन्स केले आहेत. तिनं नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीतून तिनं इंटिमेट सीन्स नेमके कसे शूट केले जातात? याबाबत भाष्य केले आहे. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत सयानी म्हणाली, "मी 2 कॅमेऱ्यांसमोर न्यूड झाली होती. सेट पू्र्णपणे बंद होते. सेटवर शूटिंगदरम्यान फक्त आवश्यक क्रू मेंबर्स उपस्थित होते. तसेच फोटोग्राफर डायरेक्टर आणि दुसरा डीपी सेटवर होता. दोघेही पुरूष होते. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वातावरण आदरयुक्त आणि व्यावसायिक राहिले", असं सयानी गुप्ता म्हणाली.

इंटिमेट सीन्सच्या अनुभवाबाबत सयानी म्हणाली, "इंटिमेट सीन्स करताना सेटवरील वातावरण खूप नियंत्रित होते. जरी बाहेरून इंटिमेट सीन्स चित्रित करताना अस्वस्थ वाटू शकते. परंतु, व्यावसायिकरित्या हाताळले तर, प्रत्यक्षात वास्तव्य खूप वेगळे असते", असं सयानी म्हणाली. तिच्या मते, चित्रपटाचा सेट आपल्या कामाचे ठिकाण आहे. त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या समजतात, असं ती म्हणाली. "दोन पुरुषांसमोर नग्न दृश्य चित्रित केले होते. परंतु, कधीही अस्वस्थ वाटलं नाही. इथे वैयक्तिक मर्यादांवर लक्ष न देता, योग्यरित्या सीन चित्रित करण्यावर लक्ष केंद्रीत केले होते", असं सयानी म्हणाली.

अभिनेत्रीच्या करिअरबद्दल सांगायचं झाल्यास, तिनं जॉली एलएलबी 2, जग्गा जासूस, आर्टिकल 15, फॅन यांसाख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकराली आहे. तिनं आतापर्यंत अनेक वेबसिरिजमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Zee Marathi Awards 2026: झी मराठी अवॉर्ड्स 2026, मालिकांमध्ये आव्हानांची चुरस, नात्यांची साथ आणि मनोरंजनाचा जल्लोष; कोण मारणार बाजी?
झी मराठी अवॉर्ड्स 2026, मालिकांमध्ये आव्हानांची चुरस, नात्यांची साथ आणि मनोरंजनाचा जल्लोष; कोण मारणार बाजी?
Mumbai Celebrity Homes, Mayor Office Schools Threat: मुंबई धमक्यांच्या ई-मेलनं हादरली; सेलिब्रिटींची घरं, महापौरांचा बंगला आणि शाळांना धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई धमक्यांच्या ई-मेलनं हादरली; सेलिब्रिटींची घरं, महापौरांचा बंगला आणि शाळांना धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
Sasare Bapre Marathi Movie: 'एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी!'; भरत जाधव, सायली संजीव, सुव्रत जोशी यांचा धम्माल मराठी सिनेमा, पोस्टर पाहिलंत?
'एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी!'; भरत जाधव, सायली संजीव, सुव्रत जोशी यांचा धम्माल मराठी सिनेमा, पोस्टर पाहिलंत?

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
Embed widget