एक्स्प्लोर

'आपल्या घरावर बॉम्ब पडल्यावर काय अवस्था होते, तशी...' देवराई जळून खाक झाल्यानंतर सयाजी शिंदे काय म्हणाले?

Devrai Project in Beed Gutted by Fire: बीडधील देवराई प्रकल्पाला भीषण आग. झाड, औषधी वनस्पती अन् पक्षांचं प्रचंड नुकसान. सयाजी शिंदेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी.

Devrai Project in Beed Gutted by Fire: सिनेअभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्या पुढाकारातून आणि वनविभागाच्या सहकार्यातून बीडच्या पालवन शिवारातील सह्याद्री देवराई प्रकल्पात झाडं लावण्यात आली होती. या प्रकल्पाला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीनं क्षणात रौद्ररूप धारण केलं. झाडं, औषधी वनस्पतींची नासधूस आणि पक्षांचा होरपळून मृत्यू झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी सयाजी शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले. मात्र, डोळ्यादेखत झाडांची नासधूस झाल्यामुळे सयाजी शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना नाराजी व्यक्त केली. 'बीडमधील घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे', असं सयाजी शिंदे म्हणाले.

"गवत जाळल्यानंतर परत चांगलं उगवतं, अशी गैरसमज आहे. निसर्गाचं प्रचंड नुकसान होतं. पक्षी, सरपटणारे प्राणी, त्यांची पिल्ले, झाडं, रोपटी आगीत जळून खाक होतात. आपल्या घरावर बॉम्ब पडल्यावर काय अवस्था होते. तशी प्राण्यांच्या घरांचीही होते", असं सयाजी शिंदे म्हणाले. "बीडमधील घटना अत्यंत दुर्देवी आहे. 2017ला जिथं गवत पण उगवत नव्हतं, ओसाड जागा होती, अशा ठिकाणी झाडं उगवली. रान हिरवंगार झालं. सयाजी शिंदे फक्त निमित्त आहे, पण रान हिरवेगार करण्यामागे अनेकांचं हात आहे", असं सयाजी म्हणाले.

"अत्यंत भयानक होतं हे सगळं. आपल्या घरातलंच कोणतरी जातं, अशी भावना मनात येते. झाडांना गांभीर्यांनी घ्यायला हवे. नागरिक म्हणून आपण सुधारलं पाहिजे. वन खातं आणि पोलि‍सांनीही याकडे लक्ष द्यायला हवे", असंही सयाजी शिंदे म्हणाले. "मे - जून महिन्यांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कलेक्टर यांनी सांगितले की, बीडमध्ये 15 लाख झाडं लावली, याची नोंद गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली. कलेक्टरचा सत्कारही करण्यात आला. त्यांनी आता उत्तर द्यावं. कुठेही यांनी बीडमध्ये 15 लाख झाडं लावली हे सांगावं. साताऱ्याहून मी बीडला जात होतो, एक-एक झाडांची मी काळजी घेतली. आता बीडच्या कलेक्टरने सांगावं कौतुक करवून का घेतलं? १५ लाख झाडांचं हिशोब द्या, ते देऊ शकता का?", असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

"झाडांच्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला हवे. झाडांची कत्तल केल्यानंतर दुसर्‍या ठिकाणी आपण झाडं लावतोय का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यकर्त्यांनी कसे वागावे, हे सर्वस्व त्यांचा प्रश्न आहे. तपोवन वाचलं पाहिजे. तपोवनमधील झाडांची कत्तल करणं चुकीचं आहे. आतापर्यंत 20-30 देवराई झाले आहेत. ४० पर्यंतचा आकडा आहे. जोपर्यंत मी जीवंत आहे. तोपर्यंत मला १०० देवराई तयार करायचे आहेत, असं माझं स्वप्न आहे", असंही सयाजी शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
Embed widget