Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा काल म्हणजेच (29 जून रोजी) बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटातील कार्तिक आणि कियाराची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या हृदयाला भावली असून या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली आहे हे जाणून घेऊयात.
पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई
'सत्यप्रेम की कथा'चे दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी केले आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे कार्तिक-कियारा ही जोडी यापूर्वी 'भूल भुलैया 2' या सुपर-सक्सेसफुल चित्रपटात दिसली होती. 2022 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टरही ठरला. तर, 'सत्यप्रेम की कथा'मध्ये कार्तिक आणि कियाराची जादुई केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळाली. मात्र, या चित्रपटाला पहिल्याच दिवशी 'भूल भुलैया 2' इतका चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.
चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसाचे सुरुवातीचे आकडे देखील समोर आले आहेत. SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सत्यप्रेम की कथा' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी अंदाजे 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वीकेंडला कमाई करण्याची अपेक्षा
'सत्यप्रेम की कथा'च्या निर्मात्यांनी हा चित्रपट बकरी ईदच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित केला. मात्र, या सुट्टीचा चित्रपटाला फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे आता निर्मात्यांना अशी आशा आहे की, वीकेंडला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. अशा परिस्थितीत कार्तिक-कियारा यांचा 'सत्यप्रेम की कथा' त्यांच्याच 'भूल भुलैया 2' चित्रपटाचा विक्रम मोडू शकेल की नाही हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे.
' सत्यप्रेम की कथा'ची स्टार कास्ट
कार्तिया आर्यनने 'सत्यप्रेम की कथा'मध्ये सत्यप्रेम अग्रवालची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर कियारा अडवाणी या चित्रपटात कथा कपाडियाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट सत्यप्रेम आणि कथा यांच्या अनोख्या प्रेमकथेवर आधारित आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये कार्तिक आणि कियारा व्यतिरिक्त, राजपाल यादव, गजराज राव, सुप्रिया पाठक, अनुराधा पटेल, शिखा तलसानिया यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकार आहेत. नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट आणि नमह पिक्चर्स यांनी संयुक्तपणे या प्रोजेक्टची निर्मिती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :