एक्स्प्लोर

Satluj Diljit Dosanjh Fees: अवघ्या 48 तासांत ओटीटीवरून हटवला; दिलजीत दोसांझने 'सतलज'साठी किती मानधन घेतलं? दिग्दर्शकानं सांगितला आकडा

पंजाबमधील अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले, पण यश आलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

Satluj Diljit Dosanjh Fees: दिलजीत दोसांझचा 'सतलज' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आणि त्यानंतर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर चित्रपटासोबतच आता त्याचे दिग्दर्शक हनी त्रेहान यांचा एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी चित्रपटासाठी दिलजीत दोसांझला कसं तयार केलं आणि त्याने या भूमिकेसाठी किती मानधन घेतलं, याबाबत खुलासा केला आहे.

'सतलज'साठी दिलजीतने किती घेतलं मानधन?

हनी त्रेहान यांनी सांगितलं की, 'सतलज' या चित्रपटातील भूमिका स्वीकारण्यासाठी दिलजीत दोसांझनी एकही रुपया मानधन मागितलं नव्हतं. ते म्हणाले "दिलजीत पाजींनी मला हात जोडून फक्त 'वाहेगुरू जी' असं म्हटलं आणि फक्त एवढंच विचारलं की, 'पाजी, मला सांगा... कधी यायचं आणि कुठे यायचं? तुम्ही फक्त वेळ आणि ठिकाण सांगा, मी तिथे येतो.' त्यांनी फीचा विषयच काढला नाही."

असा सुरू झाला चित्रपटाचा प्रवास

हनी त्रेहान यांनी पुढे सांगितलं की, त्यांनी दिलजीत दोसांझ यांना 1984 नंतरच्या पंजाबच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर दिलजीत म्हणाले की, "1984 नंतरच्या घटनांवर पूर्ण चित्रपट उभा करता येईल, अशा फार कमी कथा आहेत." त्यानंतर त्यांनी जसवंत सिंह खालडा यांचं नाव सुचवलं. मात्र त्यांच्या कुटुंबीयांकडून या कथेसाठी हक्क मिळणं खूप कठीण असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंजाबमधील अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले, पण यश आलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

संशोधन पुस्तक पाहताच दिला होकार

हनी त्रेहान यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे त्या वेळी संशोधनासाठीचं एक पुस्तक होतं. त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर जसवंत सिंह खालडा यांचा फोटो आणि 'JSK' अशी नोंद होती. ते पुस्तक दिलजीत यांना दाखवत त्यांनी, "मला जसवंत सिंह खालडा यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा आहे आणि त्यांची भूमिका तुम्ही साकारावी, अशी माझी इच्छा आहे," असं सांगितलं. हे ऐकल्यानंतर दिलजीत दोसांझ यांनी मानधनाची कोणतीही चर्चा न करता लगेच होकार दिला. त्यांनी हात जोडून "वाहेगुरू जी" असं म्हणत फक्त चित्रपटाच्या शूटिंगची तारीख आणि ठिकाण विचारलं, असा खुलासा हनी त्रेहान यांनी केला.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget