Virender Sehwag Sara Gurpal: 'क्रिकेटर्स मला मेसेज करतात'; Reality शोमध्ये दाखवले चॅट, वीरेंद्र सेहवाग म्हणाले, 'म्हणून रन होत नाहीत...'
Sara Gurpal Virender Sehwag: सारा गुरपालला क्रिकेटपटू मेसेज करत असल्याचा खुलासा तिने केला.

Sara Gurpal Reveals Cricketers Message her: अमेझॉन प्राईमवर (Amazon) सध्या नवीनच रिलीज झालेल्या एका रिॲलिटी शो ची प्रचंड चर्चा होत आहे. 'राईज अँड फॉल 2' (Rise and Fall) असे रिॲलिटी शोचे (Reality Show) नाव असून, या मध्ये नवनवीन कलाकार स्पर्धक म्हणून पहायला मिळत आहे. या शोचे अनेक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या शोचे होस्ट भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) असून, स्पर्धक यांच्याशी गप्पा मारून अनेक खुलासे करत असल्याचं दिसून येत आहे. सारा गुरुपाल हिने या शो मध्ये एन्ट्री केली आहे. यावेळी तिने आपल्या व्यक्तिक आयुष्याशी निगडीत अनेक खुलासे केले आहेत तिने होस्ट सेहवाग यांच्यासमोर क्रिकेटपटूबद्दल असे काही खुलासे केले की, शोमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
साराचा मोठा खुलासा, म्हणाली क्रिकेटर्स मेसेज करतात (Sara Gurpal Reveals Cricketers Slide Into Her DMs)
साराने शोमध्ये असा खुलासा केला की, काही क्रिकेटपटू तिला पर्सनल मेसेज करतात. शो मधील सारा आणि विरेंद्र सेहवाग यांच्यातील बातचीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या शोमध्ये तिने क्रिकेटपटूंकडून येणाऱ्या मेसेजबद्दल सांगितले. तिने सेहवाग यांना चॅट दाखवले. यावेळी सेहवाग यांनी खास शैलीत विनोद केला. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
यावेळी सेहवाग साराला म्हणतात की, ' अनेक क्रिकेटपटूंनी तुला डीएम केलं आहे, असं आम्ही ऐकलं आहे ', यावर सारा म्हणते की, ' हो, सर अनेक क्रिकेटपटू मला मेसेज करतात'. त्यानंतर सारा सगळे मेसेज दाखवते. ' अच्छा याने पण मेसेज केला आहे का? म्हणूनच रन होत नाहीयेत ', असं विनोदी शैलीत म्हणतात. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. विरेंद्र सेहवाग यांनी होस्ट केलेल्या या शो मध्ये एकूण 15 स्पर्धक आहेत. या शो मध्ये कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















