एक्स्प्लोर

'मी जळत्या चितेची राख काढली अन् अंगावर...', वडिलांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्याची अवस्था बिकट, सासऱ्यांसमोरच..

Sanjay Mishra Recalls Painful Memories of Losing His Father: संजय मिश्रा यांनी वडिलांच्या मृत्यूमुळे झालेल्या मानसिक धक्क्याबद्दल एका पॉडकास्टद्वारे भावनिक खुलासा केला.

Sanjay Mishra father death emotional story: गोलमाल, मसान, आँखो देखी, या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे संजय मिश्रा, आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकेच चर्चेत असतात. त्यांनी आपल्या स्ट्रलिंगच्या काळात बरेच चढ उतार पाहिले आहेत.  त्यांनी अनेक मुलाखतीतून आपले स्ट्रगल आणि वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी, कसे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले,   काही दिवसांत  वडिलांचा नेमका कसा मृत्यू झाला, याबाबत माहिती दिली.  संजय मिश्रा त्या धक्क्यातून कधीच सावरू शकले नाहीत.  त्यांनी अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये वडिलांना गमावल्यामुळे झालेल्या दु:खाबद्दल माहिती दिली. त्यांनी पत्नी किरण आणि लग्नाबाबतही खुलासा केला. ते क्वचितच मुलाखतीत आपल्या  वैयक्तिक आयुष्याबाबत बोलतात. पण या पॉडकास्टमध्ये त्यांनी उघडपणे सर्व सांगितलं.

संजय मिश्रा यांनी उत्तराखंडच्या  रहिवासी असलेल्या किरणशी विवाह केला होता.  त्यांनी अरेंज्ड मॅरेज केले होते. सुरूवातीला त्यांना जुळवून घेताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता, असं  त्यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं. संजय मिश्रा म्हणाले, "पत्नी केवळ दोन मुलांचीच नाही तर, संपूर्ण घराचीही काळजी घेते.  जेव्हा माझं किरणसोबत लग्न झालं होतं, तेव्हा मला माझा मित्र सौरभ शुक्लाने घरात भाडेकरूसारखं राहण्यास सांगितलं होतं. यामुळे मी माझ्या घरात भाडेकरू प्रमाणे राहू लागलो.  मला किरणसोबत जुळवून घेताना थोड्या अडचणींचा सामना करावा लागला होता",  असं संजय मिश्रा म्हणाले.

वडिलांच्या मृत्यूबाबत संजय मिश्रा म्हणाले, "त्या दिवशी सासरे अचानक घरी आले होते. तेव्हा मी ड्रायव्हरसोबत दारू पित होतो. मी तेव्हा माझ्या ड्रायव्हरला म्हणालो  की, मला वडिलांच्या अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी घेऊन जा. मी गेलो. घाटावर चिता जळत होती. त्या चितेतील राख  मी शरीरावर लावली,  नंतर वडिलांना हाक मारली. मी खूप रडलो. अंगावर राख लावलेली असताना,  काहींनी स्मशानभूमीतच माझ्याजवळ येऊन फोटो काढले", असं संजय मिश्रा म्हणाले.

"काही वेळानंतर मी माझ्या घरी गेलो. त्यावेळेस मी  पांढऱ्या रंगाचा पँट शर्ट घातला होता. माझ्या अंगावर आणि केसांवरही राख होती.  माझ्या सासऱ्यांनी  मला पाहिलं, नंतर त्यांना त्यांच्या मुलीचे स्वप्न दिसले. ड्रायव्हरने माझ्या अंगावर तिथेच पाणी ओतलं. तसेच आंघोळ घातली.  तेव्हा सासऱ्यांनी मला विचारले की, कुठून येत आहे, तेव्हा त्यांना, 'अरे त्याच्याबद्दल विचारू नका.  ते त्याच ठिकाणाहून येत आहे, जिथे त्यांच्या वडिलांचे निधन झाले', असं उत्तर त्यांना उत्तर देण्यात आले.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Lata Mangeshkar Copy Song: अमेरिकेत कॉपी करण्यात आलेलं लता मंगेशकरांचं हे गाणं, 4000 कोटींचा खटला केलेला दाखल; ओरिजिनलपेक्षाही रिमेक ठरलेला सुपरहिट
अमेरिकेत कॉपी करण्यात आलेलं लता मंगेशकरांचं हे गाणं, 4000 कोटींचा खटला केलेला दाखल; ओरिजिनलपेक्षाही रिमेक ठरलेला सुपरहिट
Popular Actress Mahira Khan Pregnancy: वयाच्या 41व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री होणार आई; शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री; बेबी बंप प्लॉट करत दिली गुड न्यूज
वयाच्या 41व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री होणार आई; शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री; बेबी बंप प्लॉट करत दिली गुड न्यूज
Box Office Collection: 'हनुमान अंश' पडला मिर्झापूरवर भारी!रविवारी बॉक्स ऑफिसवर कोणाची दहशत? हैवानचा खेळ फसला; कोणी किती कमावले? 
'हनुमान अंश' पडला मिर्झापूरवर भारी!रविवारी बॉक्स ऑफिसवर कोणाची दहशत? हैवानचा खेळ फसला; कोणी किती कमावले? 
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget