एक्स्प्लोर

Marathi Director Sanjay Jadhav On Duniyadari 2: 'दुनियादारी 2'ची दणक्यात घोषणा, पण सिनेमा आलाच नाही, असं का? दिग्दर्शक संजय जाधव यांनी कुणालाच ठाऊक नसलेलं 'ते' कारण सांगितलं

Marathi Director Sanjay Jadhav On Duniyadari 2: तरुणाईला आवडणाऱ्या विषयांवर अनेक सुपरहिट सिनेमे करणाऱ्या आणि कायम हसतमुख असणाऱ्या मराठमोळ्या दिग्दर्शकानं तब्बल दोनदा स्वतःला संपवण्याचा विचार केलेला.

Marathi Director Sanjay Jadhav On Duniyadari 2: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) आघाडीचे दिग्दर्शक (Marathi Director), सिनेमेटोग्राफर (Cinematographer) आणि निर्माते संजय जाधव त्यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. दिग्दर्शक संजय जाधव यांनी नुकतीच सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. तरुणाईला आवडणाऱ्या विषयांवर अनेक सुपरहिट सिनेमे करणाऱ्या आणि कायम हसतमुख असणाऱ्या मराठमोळ्या दिग्दर्शकानं तब्बल दोनदा स्वतःला संपवण्याचा विचार केलेला. तसेच, या मुलाखतीत बोलताना त्यांनी घोषणा करुनही 'दुनियादारी 2' का आला नाही, हेसुद्धा सांगून टाकलं. 

मराठीतला सुपरहिट सिनेमा 'दुनियादारी'चं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलेलं. सुहास शिरवळकर यांच्या गाजलेल्या 'दुनियादारी' कादंबरीवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला. सिनेमातली पात्र, यातली गाणी यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला. 2013 साली रिलीज झालेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर त्यावेळी 32 करोड रुपयांची कमाई केलेली. त्यानंतर दुनियादारी सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरु झाली. तशी घोषणाही करण्यात आली, पण सिनेमा काही आलाच नाही. याचंच उत्तर आता संजय जाधव यांनी दिलंय. 

'दुनियादारी 2'बाबत काय म्हणाले, दिग्दर्शक संजय जाधव?

मराठीतला सुपरहिट सिनेमा 'दुनियादारी'चे दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितलं की, "मी 'दुनियादारी 2' करणार नाही, असं ठरवलंय. मी 'दुनियादारी'पेक्षा 'दुनियादारी 2' कितीही सुंदर बनवला, तरीही तुलना होणारच... की अरे नाही पहिल्यासारखी मजा नाही... सोशल मीडियावर बोलणं खूप सोपं आहे, पण त्यामागची मेहनत लोकांना कळत नाही... हे मला झेपणार नाही... दुसरं म्हणजे, 'दुनियादारी 2' हा प्रोजेक्ट ऑन होऊन इतक्या वेळेला ऑफ झालाय की, मला वाटतंय वरून सुहास शिरवळकर सांगत असतील की, नकोत करू... तो एक सिग्नल पण घेतला पाहिजे आणि त्या गोष्टीचा आदरही केला पाहिजे..."

पुढे बोलताना संजय जाधव यांनी सांगितलं की, "दुनियादारी 2'ची दोनदा घोषणा करण्यात आली. ज्यावेळी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझं 'दुनियादारी'चं वर्कशॉप सुरू होणार होतं. पण मग ते थांबलं... त्यानंतरही अनेकदा सिनेमाचं काम काही ना काही कारणामुळे थांबलं..."

"दुनियादारी' हे माझं बाळ आहे. चांगलं, वाईट जे काही आहे ते मी बनवलंय. आता माझ्यावर किंवा माझ्या स्क्रिप्टवर लोकांचा विश्वासच नाही... सगळे हेच विचारतात, कास्टिंग तेच आहे ना? असं नका ना करू यार... त्या कलाकारांना न घेता मी काम करणारच नाहीये का? पण तुम्ही माझ्यावर काहीतरी विश्वास दाखवा... जर तुम्हाला माझ्यावर विश्वास दाखवायचाय तर मग मला पण काम करायचं नाही...", असं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Embed widget