एक्स्प्लोर

Sameer Chaughule MNS Raj Thackeray Meet: 'दादरलाच आहात मग घरी येऊन जा..' राज ठाकरेंचा 'हास्यजत्रा'फेम समीर चौघुलेला कॉल; भेट होताच समीरची खास पोस्ट

Sameer Chaughule MNS Raj Thackeray Meet: या खास भेटीचा फोटो पोस्ट करत समीरने राज ठाकरेंना भेटल्याचा अनुभव शेअर केलाय

Sameer Chaughule MNS Raj Thackeray Meet: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता समीर चौघुले (Sameer Chaughule)चर्चेत आहे. त्याच्या एकपात्री प्रयोगाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमाला नुकतेच 100 प्रयोग पूर्ण झाले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात विनोदी लेखक, अभिनेता म्हणून समीरची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली आहे. मग यात कलासक्त म्हणून ओळखले जाणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे( Raj Thackeray) कसे मागे राहतील? 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' या कार्यक्रमाच्या निमित्ताने दादरला असल्याचं कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समीरला फोन करून' 'दादरलाच आहात तर घरी येऊन जा ' असा कॉल करत घरी भेटायला बोलावलं. या खास भेटीचा फोटो पोस्ट करत समीरने राज ठाकरेंना भेटल्याचा अनुभव शेअर केलाय.( Sameer Chaughule MNS Raj Thackeray Meet)

काय म्हणाला समीर चोघुले ? (Sameer Chaughule)

समीर म्हणाला, “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे १०० प्रयोग झाल्याबद्दल अभिनंदनाचे अनेक फोन आले ..पण एक कॉल खूपच अनपेक्षित आणि खास होता…तो होता अत्यंत दिलखुलास, दर्दी, कलासक्त नेते..माननीय राजसाहेब ठाकरे यांचा - “दादरलाच आहात मग घरी येऊन जा” ….आणि मग झाली एका राजामाणसाबरोबर एक सहजसुंदर भेट, भरपूर गप्पा आणि हास्यजत्रेवरील प्रेम.. आणि हो मी निघताना 100 प्रयोग झाल्याबद्दल मला आणि माझ्या सहचारिणीला दिलेली सुंदर भेटवस्तू ..मनापासून आभार साहेब….

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

समीर चौघुलेच्या ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री कार्यक्रमाला प्रेक्षकांचा  भरभरून प्रतिसाद मिळतोय.‘हास्यजत्रा’मध्ये अवघ्या 15 -20  मिनिटांच्या स्किटमधून लक्ष वेधून घेणारा समीर, या एकपात्री कार्यक्रमात मात्र जवळपास अडीच तास रंगमंचावर एकट्यानेच प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. विशेष म्हणजे, कुठल्याही द्विअर्थी संवादांचा किंवा अश्लील विनोदांचा आधार न घेता तो  केवळ नितळ आणि दर्जेदार विनोदातून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सतत पिकणारा हशा, टाळ्यांचा गजर आणि उत्साहाने भरलेलं वातावरण होत असल्याचं प्रेक्षक सांगतात.

हेही वाचा:

RJ Sumeet: कोल्हापूरच्या RJ सुमितनं सांगितला भयंकर अनुभव; किडनी निकामी, कोमात जायचा धोका, मृत्यूच्या दाढेतून परतला

 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget