Sikandar Teaser Release Date Out: बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाची प्रत्येकजण वाट पाहतो. सलमान खानचा चित्रपट आल्यावर चित्रपटगृहांत सिनेरसिकांची झुंबड उडते. दरम्यान, आता सलमान खानच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सलमान खानच्या सिकंदर या आगामीच चित्रपटाचे टिझर लॉन्च होणार आहे. सिकंदर चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या टिझर रिलिजसाठीची तारीख जाहीर केली आहे.
'सिकंदर' चित्रपटेच टिझर नेमके कधी रिलीज होणार?
साजिद नाडियाडवाला यांनी सिकंदर या चित्रपटाची निर्मिती केली ए.आर. मुरुगाडॉस यांनी या चित्रपटाला दिग्दर्शित केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अभिनेत्री काजल अग्रवाल हे स्टार्स प्रमुख भूमिकेत दिसतील. येत्या 27 डिसेंबर 2024 रोजी सलमान खानचा वाढदिवस आहे. याच वाढदिवसाचे औचित्य साधून सिकंदर या चित्रपटाचा टिझर रिलीज केला जाईल. म्हणजेच सलमान खानच्या वाढदिवशीच सिकंदर या चित्रपटात नेमकं काय असेल, हे सर्वांना समजणार आहे.
सलमान खान हा बॉलिवुडचा मोठा अभिनेता आहे. त्याला सोशल मीडियावर कोट्यवधी लोक फॉलो करतात. त्याच्या चित्रपटाची लाखो सिनेरसिक आतुरतेने वाट पाहात असतात. असे असताना सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटाचा टिझर पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच सलमान खानच्या चाहत्यांसाठी हा टिझर म्हणजे एक पर्वणीच असणार आहे.
पिंकविला या सिनेमाविषयक वृत्तसंकेतस्थळानुसार सलमान खानच्या वाढदिवशीच सिकंदर या चित्रपटाचे फस्ट लुक पोस्टरही लॉन्च केले जाईल. सिकंदर या चित्रपटाच्या टिझरचे सध्या एडिटिंगचे काम चालू आहे.
सिकंदर हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार?
सलमान खानचा हा चित्रपट आगामी वर्षात म्हणजेच 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना ही अभिनेत्री प्रमुख नायिकेच्या भूमिकेत असेल. रश्मिकाचा पुष्पा-2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने क
माईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. असे असताना रश्मिकाचा सिकंदर हा चित्रपट नेमकी काय जादू करणार हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा :
आमीर खानने केलेलं असं घाणेरडं काम, ज्याचा जुही चावलाला आला होता भयंकर राग, दिलं होतं शूटिंग सोडून!