मुंबई : बॉलिवूडमध्ये आमीर खान (Aamir Khan) हे नाव खूप मोठं आहे. आतापर्यंत त्याने भारतीय सिनेसृष्टीला अनेक मोठे चित्रपट दिलेले आहेत. भारतात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. कोणत्याही चित्रपटात काम करायचे असेल तर त्याआधी तो चित्रपटाचा विषय काय आहे? याचा प्राधान्याने विचार करतो. एकदा का चित्रपट करायला घेतला की तो पूर्ण ताकदीने त्यात अभिनय करतो. शूटिंगदरम्यान आपल्या मित्रांना कंटाळवाणे होऊ नये म्हणून तो सेटवर थट्टा-मस्करीही करतो. मात्र हीच थट्टा-मस्करी एकदा आमीर खानच्या अंगलट आली होती. त्याच्या एका कृत्यामुळे अभिनेत्री जुही चावलाला भयंकार राग आला होता. जुही थेट शूटिंग सोडून घरी गेली होती. 


आमीर-जुहीची जोडी सर्वांनाच आवडायची


आमीर खानने जुही चावलासोबत एक प्रँक केला होता. या प्रँकचा जुहीला भयंकर राग आला होता. नाराज होऊन जुही चावलाने आमीर खानसोबत एकूण 7 वर्षे काम केलं नव्हतं.आमीर खान आणि जुही चावला ही जोडी 90 च्या दशकात चांगलीच प्रसिद्ध होती. या जोडीचे ‘कयामत से कयामत तक’, ‘इश्क’, ‘हम हैं राही प्यार के’ असे अनेक चित्रपट आले. यातील काही चित्रपट चांगलेच हिट ठरले. त्यांच्या चित्रपटातील गीतही प्रेक्षकांना चांगलेच आवडले होते. आमीर आणि जुही शूटिंगच्या सेटवर चांगल्या पद्धतीने काम करायचे. इश्क या चित्रपटात आमीरने केलेल्या प्रँकमुळे जुही चांगलीच भकडली होती. एका कृत्यामुळे त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. 


नेमकं काय घडलं होतं?


18व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शक फराह खानने आमीर खानची अनेक गुपितं खोलली होती. तिनेच आमीर खानच्या या कृत्याबद्दल सांगितले होते. इश्क या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. त्यावेळी आमीर खानने जुहीसोबत एक प्रँक करायचे ठरवले होते. आमीरने मला ज्योतिषविद्या येते, असे जुही चावलाला सांगितले. जुहीनेही त्याच्यावर विश्वास ठेवून आपला हात आमीर खानला दिला. मात्र आमीरने तिचे भविष्य पाहण्याऐवजी तो तिच्या हातावर थुंकला होता. याच कृत्याचा जुहीला भयंकर राग आला होता. 


जुहीने नंतर 7 वर्षे आमीरसोबत चित्रपटच केला नाही


आमीरच्या या कृत्यामुळे जुही चावलाने शूटिंग सोडून दिले. ती शूटिंग सोडून थेट घरी निघून गेली. तसेच दुसऱ्या दिवशीही ती शूटिंगला आली नाही. ही बाब दिग्दर्शक इंद्रकुमार यांना समजली. त्यांनी आमीर खानला जुही चावलाची माफी मागायला लावली. आमीर खानने माफी मागितल्यानंतर जुही चावलाने इश्क या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटानंतर मात्र जुही चावलाने आमीर खानसोबत पुढचे 7 वर्षे काम केले नाही. 


हेही वाचा :


3 ग्रॅमी मिळवले, पद्म विभूषणनेही सन्मान, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या झाकीर हुसैन यांची डोळे दिपवणारी कारकीर्द!


Netflix Top 10: क्राईम थ्रिलरपासून कॉमेडीपर्यंत... नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतायत 'या' 10 फिल्म्स


2024 चा सर्वात मोठा खिलाडी; ज्यानं ठोकला ब्लॉकबस्टर फिल्म्सचा सिक्सर, ना हा शाहरुख खान, ना अल्लू अर्जुन... मग कोण?