Sanjay Gaikwad : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार पडला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य दिसून आले. शिवसेना शिंदे गटातून मंजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant), दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना डच्चू देण्यात आला. त्यामुळे हे नेते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. आता यावर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
संजय गायकवाड म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. काही नव्या चेहऱ्यांना संधी देताना काही धक्के सुद्धा बघितले. अडीच वर्षाचा फॉर्मुला योग्य आहे. कारण नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांनी मंत्रीपद भोगली आहेत. त्यामुळे त्यांना नाराज व्हायचं काम नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मी मंत्रीपदासाठी मागणी करणार : संजय गायकवाड
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेतील मंत्र्यांना अडीच वर्ष झाल्यानंतर मी मंत्रीपदासाठी मागणी करणार आहे. महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीत खासदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी काम केलं नव्हतं. याची तक्रार मी एकनाथ शिंदे यांच्याश अमित शाह यांच्याकडे केली. मात्र, मला वाटत नाही माझ्या तक्रारीमुळे भाजपच्या एका आमदाराचे मंत्रिपद हुकले, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
मी नाराज नाही : दीपक केसरकर
दरम्यान, नाराजीच्या चर्चांवर दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की, मी नाराज नाही. अडीच वर्ष मला मंत्रिपद मिळालं मी त्यात खुश आहे. आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी आहे. शेवटी इतरांनाही संधी मिळायला हवी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर तानाजी सावंत काल शपथविधी सुरु असताना राजभवनात आले नाही. तानाजी सावंत हे नागपूरच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधून बॅग पॅक करुन निघून गेले होते. आजपासून अधिवेशन असल्याने सर्व आमदार नागपुरात असताना तानाजी सावंत माघारी परतले होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र तब्येत ठीक नसल्याने तानाजी सावंत पुण्याला परतल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Sadabhau Khot : आमची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले, सदाभाऊ खोतांची मंत्रिपद न मिळाल्यानं खंत