मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही चेहरे आहेत, ज्यांचे आज लाखोंनी चाहते असल्याचं दिसतं. मात्र त्यांचे सुरुवातीचे दिवस फार कठीण होते, याची कल्पना फारच कमी लोकांना असते. शाहरुख खानने तर बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी फार कठीण दिवस काढले होते. पण जिद्दीने पेटून उठून शाहरुख खानप्रमाणेच अनेक नेत्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. यात अभिनेत अक्षय कुमारचाही समावेश आहे. खुद्द त्यानेच त्याच्या कठीण दिवसांबाबत माहिती दिली आहे. 


दिवसाला कमवायचा फक्त 5000 रुपये


अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान तो बॉलिवूडमध्ये नेमका कसा आला? याबाबत सविस्तर सांगितलं आहे. खुद्द अक्षय कुमार यानेच सांगितल्यानुसार तो महिन्याला 5000 रुपये कमवायचा.


मॉडेलिंग काय असते तेही माहिती नव्हतं     


मला मार्शल आर्ट स्कूल खोलायचे होते. मी मर्चंट नेव्हीमध्ये जाण्याचेही स्वप्न पाहात होतो. चित्रपट क्षेत्राबाबत काहीच माहिती नव्हते. एका दिवशी मला कोणीतरी पाहिलं आणि तू दिसायला चांगला दिसतोस. मॉडेलिंगमध्ये का येत नाही, अशी विचारणा केली. मॉडेलिंग काय असतं मला हेही माहिती नव्हतं. मॉडेलिंगमध्ये काय करायचं असतं, असं मी त्यांना विचारलं. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता येऊन भेटायला सांगितलं. 


सकाळी 11 वाजता भेटायला गेलो अन्...


त्या काळात मी महिन्याला 5000 रुपये कमवायचो. मी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता त्या व्यक्तीला भटलो. ही साधारण 1988 सालातील गोष्ट आहे. मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला बसायला सांगितलं, त्यानंतर माझा चित्रपटातील प्रवास चालू झाला, अशी माहिती अक्षय कुमार यांनी सांगितले. 


आगामी वर्षात येणार अनेक मोठे चित्रपट


दरम्यान, अक्षय कुमार आज बॉलिवूडमधील मोठा अभिनेता आहे. गेल्या अनेक दशकांपासून तो सातत्याने वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांत काम करताना दिसतोय. कोणतेही व्यसन न करणारा, आपला दिनक्रम तंतोतंत पाळणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. त्याने भारतीय सिनेसृष्टीला आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आगामी वर्षातही त्याचे काही मोठे चित्रपट येणार आहेत. 


हेही वाचा : 


आमीर खानने केलेलं असं घाणेरडं काम, ज्याचा जुही चावलाला आला होता भयंकर राग, दिलं होतं शूटिंग सोडून!


Netflix Top 10: क्राईम थ्रिलरपासून कॉमेडीपर्यंत... नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतायत 'या' 10 फिल्म्स


Pushpa 2 Break Records: अल्लू अर्जुनच्या स्टारडमनं शाहरुख खान, राजकुमार रावला पछाडलं; 'पुष्पा 2'चा हिंदीतही नवा विक्रम