महागडी कार, आलीशान घर, 4 शहरांत करोडोची प्रॉपर्टी, 'पुष्पा'च्या 'श्रीवल्ली'ची संपत्ती पाहून थक्क व्हाल!
पुष्पा-1 आणि पुष्पा-2 या चित्रपटांत अभिनय करून संपूर्ण भारतावर राज्य करणारी अभिनेत्री रश्किमा मंदान्ना सध्या चांगलीच चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुष्पा-2 या चित्रपटात तिने केलेला अभिनय, तिने केलेले नृत्य सर्वांनाच आडले आहे.
रश्मिकाने या चित्रपटात श्रीवल्ली हे पात्र साकारले आहे.
दरम्यान, पुष्पा-2 चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर रश्मिका मंदान्नाच्या संपत्तीची चर्चा होत आहे.
तिची संपत्ती किती आहे? असं विचारलं जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार रश्मिका मंदान्नाने पुष्पा-2 या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये फी घेतली आहे.
तिची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.
देशातील अनेक शहरांत तिची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
रश्मिकाचा बंगळुरूमध्ये 8 कोटी रुपयांचा एक बंगला आहे.
यासह कुर्ग, गोवा, हैदराबात येथेही तिची आलीशान घरं आहेत.
2021 साली तिने मुंबईतही एक अपार्टमेंट घेतलं होतं.
रश्मिकाकडे एक रेंज रोव्हर स्पोर्ट कार आहे. या कारची किंमत 1.64 ते 1.84 कोटी रुपये आहे.
तिच्याकडे 40 लाखांची ऑडी क्यू-3, 50 लाख रुपयांची मर्सिडीझ बेंझ सी क्लास, एक टोयोटा कार, ह्युंदाई क्रेटा या गाड्या आहेत.