Weekly Horoscope 16 To 22 December 2024 Lucky Zodiacs : डिसेंबरचा तिसरा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. खरं तर, 16 डिसेंबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात प्रतियुति राजयोगासह (Pratiyuti Yog) अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा अडचणींपासून दूर ठेवेल. या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या प्रलंबित कामांना गती मिळेल. या आठवड्यात जमीन, मालमत्ता आणि इतर न्यायालयीन प्रकरणं मार्गी लागल्याने प्रचंड मानसिक शांती मिळेल. या राशीचे तरुण या आठवड्यात त्यांचा बराचसा वेळ मजेत घालवतील. या राशीचे लोक जे करिअरच्या शोधात आहेत त्यांना या आठवड्यात अनुभवी लोकांकडून चांगलं मार्गदर्शन मिळेल. नोकरदार लोकांना या आठवड्यात त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुमच्या कामाचं कौतुक करतील.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा हा आठवडा करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पात पैसे गुंतवू शकता. या आठवड्यात तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती तुम्हाला भविष्यात मोठा लाभ देईल. व्यापारी वर्गातील लोकांना दीर्घकाळ जे काही नुकसान सहन करावं लागत होतं त्याचं रुपांतर या आठवड्यात नफ्यात होईल. या काळात प्रिय व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्याकडून काही चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. या आठवड्यात तुम्ही अचानक सहलीला जाऊ शकता.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती या काळात चांगली राहील. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतात. ज्या लोकांचे पैसे एखाद्या ठिकाणी अडकले आहेत ते आज ते परत मिळवू शकतात. या आठवड्यात न्यायालयाशी संबंधित प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने येऊ शकतो. या राशीचे लोक जे प्रेम विवाह करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना या आठवड्यात त्या दिशेने यश मिळू शकतं.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या काल्पनिक जगातून बाहेर पडण्याची गरज आहे. प्रयत्न करून वास्तवाला सामोरं जावं लागेल. तरी, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ दिसेल. तुम्ही कोणतेही काम पूर्ण समर्पणाने पूर्ण कराल, त्या सर्वांमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचं सहकार्य मिळेल. या आठवड्यात अपेक्षित नफा मिळाल्याने व्यावसायिकांना आनंद होईल. पण, तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल थोडं सावध राहावं लागेल. आपल्या सभोवतालच्या गुप्त शत्रूंपासून सावध रहा.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. या आठवड्यात एकामागून एक अनेक चांगल्या संधी तुमच्या वाट्याला येतील. फक्त त्यांना आपल्या हातांनी गमवू नका. तरुणांसाठी हा आठवडा मजेचा असणार आहे. तुम्हाला एकामागून एक मनोरंजनाच्या अनेक संधी मिळतील. स्त्री मित्राच्या मदतीने तुमची अनेक प्रलंबित कामं पूर्ण होतील. या आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी अनुभवी व्यक्तीच्या मदतीने चांगले परिणाम मिळतील. मित्र किंवा कुटूंबातील सदस्यावर दीर्घकाळापासून असलेली नाराजी दूर होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :