Best Hindi Web Series 2021 : 2021 मध्ये अनेक वेब सीरिज ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाल्या. त्यापैकी काही वेब सीरिज या लोकांच्या पसंतीस पडल्या. जाणून घेऊयात 2021 मध्ये कोण कोणत्या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली तसेच कोणत्या वेब सीरिज चर्चेत होत्या. 


द फॅमिली मॅन-2 (The Family Man 2)
प्राइम व्हिडीओवरील द फॅमिली मॅन-2 या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या सीरिजमध्ये सस्पेंस, थ्रिलर आणि अॅक्शन अशा सर्व गोष्टी आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. द फॅमिली मॅन-2 मध्ये समंथा आणि मनोज वाजपेयी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. वेब सिरीजच्या कथानकामुळे तसेच कलाकारांच्या अभिनयामुळे ही वेब सीरिज चर्चेत होती. 


मुंबई डायरिज (Mumbai Diaries 26/11) 
मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स तसेच इतर स्टाफने कशी परिस्थिती हाताळली या सर्व गोष्टी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. वेब सीरिजमध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा आणि मृण्मयी देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली.


बॉम्बे बेगम्स  (Bombay Begums)
ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झालेल्या बॉम्बे बेगम्स या वेब सीरिजने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. या वेब सीरिजच्या कथानकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजमध्ये पूजा भट्ट,अमृता सुभाष,प्लाबिता बोरठाकुर आणि शहाणा गोस्वामी यांनी या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. महिलांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर या वेब सीरिजचे कथानक आधारित आहे. 


संबंधित बातम्या


Arbaaz Khan-Malaika Arora Divorce : मलायकासोबत घटस्फोटानंतर ट्रोल झाला होता अरबाज; दिले सडेतोड उत्तर


Rubina Dilaik : ...म्हणून चाहत्यावर भडकली रुबिना दिलैक; शेअर केली पोस्ट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha