Rubina Dilaik Slams Fan For Shared Her Edited Photo : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस 14 (Bigg Boss) या शोची विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik)सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते.  रुबिनाच्या सोशल मीडियावरील पोस्टना नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच  रुबिनाचा एक फोटो तिच्या चाहत्याने एडिट करून सोशल मीडियावर शेअर केला. हा  फोटो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर  रुबिनाने हा एडिट केलेला फोटो शेअर केला. 


 रुबिनाची पोस्ट


चाहत्याने एडिट केलेला फोटो शेअर करून   रुबिनाने कॅप्शन दिलं, 'असा फोटो एडिट करणाऱ्या हुशार व्यक्तीला मला भेटायचे आहे. त्याला भेटून मला विचारायचंय की या व्यक्तीला आयुष्यात किती जणांनी मारले आहे.'   रुबिनानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचे दोन फोटो दिसत आहेत. त्या फोटोंमधील एक फोटो हा  रुबिना जेव्हा मिस शिमला ही स्पर्धा जिंकली होती तेव्हाचा आहे. 



 रुबिनाच्या छोटी बहू, जनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. बिग बॉस 14 या शो जिंकल्यानंतर रुबिनानानं  अर्ध (Ardh)हा चित्रपट साइन केला. या चित्रपटात  रुबिनासोबतच अभिनेता राजपाल यादव आणि हितेन तेजवानी हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 






Arbaaz Khan-Malaika Arora Divorce : मलायकासोबत घटस्फोटानंतर ट्रोल झाला होता अरबाज; दिले सडेतोड उत्तर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Rubina Dilaik: बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना Rubina Dilaik चे सडेतोड उत्तर; पोस्ट चर्चेत