Anushka Sharma Comeback : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्यासोबत 'रब ने बना दी जोड़ी (Rab Ne Bana Di Jodi)' (2008) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनुष्का शर्मा (Anushka Sharma Upcoming Films) ज्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे, त्यापैकी दोन चित्रपट चित्रपट गृहांमध्ये रिलीज होणार असून एक चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. 



2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिल्यानंतर अनुष्का शर्मानं (Anushka Sharma Daughter) चित्रपटातून काही काळासाठी ब्रेक घेतला होती. तेव्हापासूनच अनुष्काच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. परंतु, एका विश्वसनिय सुत्रांनी एबीपी माझा दिलेल्या माहितीनुसार, "अनुष्का फक्त एका नाही, तर तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यापैकी दोन चित्रपट थिएटरमध्ये तर एक थेट ओटीटीवर येणार आहे."


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आई झाल्यानंतरही करियरवर फोकस करणार असल्याचं  अनुष्कानं (Anushka Sharma Films) आधीपासूनच ठरवलं होतं. अशातच वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांसोबतच विनोदी चित्रपटांमध्येही भूमिका साकरण्यासाठी अनुष्का शर्मा उत्सुक आहे. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार यासंदर्भातील अधिकृत तारखा रिलीज करण्यात येतील. अनुष्का तिनही चित्रपटांबाबत खूप उत्सुक आहे. 


महत्त्वाची बाब म्हणजे, अनुष्कान (Anushka Sharma Interview) यापूर्वीच एका मुलाखतीत बोलताना मी शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करत राहिल असं सांगितलं होतं. दरम्यान, मुलीच्या जन्मानंतर अनुष्कानं काही काळासाठी बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा ती लवकरच चित्रपटांमधून ताहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :