Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आजवर अनेकदा लोकांच्या मदतीला धावला आहे. मदत केलेल्या लोकांनी आजवर पुढे येऊन सलमानच्या (Salman Khan) सहाय्यतेबाबत भाष्य केलं आहे. मात्र, काही लोकांना केलेली मदत तो उघडपणे सांगत देखील नाही. दरम्यान, सलमान दिलेला शब्द कशा पद्धतीने पाळतो? याचा संदर्भ सलमानच्या सध्याच्या एका भेटीने मिळाला आहे. सलमान नुकताच एका 9 वर्षीय जगनबीर नावाच्या चिमुकल्याला भेटला. जगनबीरने 9 वेळेस किमोथेरेपी झाल्यानंतर कॅन्सरला हरवले आहे. सलमान खानने (Salman Khan) 2018 मध्ये जगनबीरची पहिल्यांदा भेट घेतली होती. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ही भेट झाली होती. तेव्हा 4 वर्षीय मुलावर ट्यूमरच्या उचचारासाठा किमोथेरेपी सुरु होती. तेव्हा त्याने पुन्हा एकदा भेटण्याचा शब्द दिला होता. 


'सलमानने दिलेला शब्द पाळला' 


कॅन्सरविरुद्धची लढाई यशस्वीपणे पार केल्यानंतर सलमानने जगनबीरला पुन्हा एकदा भेटण्याचा शब्द दिला होता. ज्यामुळे जगनबीरची कॅन्सरविरुद्धच्या लढाईसाठी मानसिक तयारी होणार होती. दरम्यान, जगनबीरने कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकली. तो पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर सलमानने डिसेंबर 2023 मध्ये जगनबीरच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. त्याच्यावर उपचार सुरु असताना सलमानने भेट घेण्याचा शब्द दिला होता. तो त्याने या कृतीतून पाळला आहे. 


3 वर्षाचा असताना झाला होता ट्यूमर 


'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत जगनबीरच्या आईने काही खुलासे केले होते. जगनबीरची आई सुखबीर म्हणाली, 3 वर्षाचा असताना जगनबीरला ट्यूमर झाल्याचे समजले. रुपयाच्या आकारचा ट्यूमर असल्याचे आईने म्हटले होते. त्यानंतर त्याची दृश्यमानता कमी होऊ लागली होती. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी दिल्ली किंवा मुंबईत उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जगनबीरच्या वडिलांनी त्याला उपचारासाठी मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला. चिमुकल्या जगनला विश्वास होता की, तो सलमान खानला नक्कीच भेटेल. 


सलमानने चिमुकल्याला दिला होता शब्द 


सुखबीर कौरने खुलासा केला की, जगनची खरी परिस्थिती न सांगण्याचा निर्णय घेतला होता. जगनबीर जेव्हा रुग्णालयात उपचार घेत होता, तेव्हा त्याचा एक व्हिडीओ बनवण्यात आला होता. यातून त्याने सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा व्हिडीओ सलमानपर्यंत पोहोचला. त्यानंतर सलमानने त्याला भेटून त्याची इच्छा पूर्ण केली. जगनबीरची आई म्हणाली की, सलमानला भेटल्यानंतर तो फार खुश होता. त्याची दृश्यमानता पूर्ववत झाली आहे. आता तो शाळेतही जातो. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Ayushmann Khurrana : "दिल दिल पाकिस्तान"; आयुष्मान खुरानाने कॉन्सर्टमध्ये गायलं गाणं अन् नेटकरी भडकले; म्हणाले,"देशद्रोही"