Mobile Scrapping Policy :  पाच वर्ष जुना फोन तुम्ही वापरु शकणार (Mobile) नाही. दहा वर्षे जुन्या (Mobile Scrapping Policy) वाहनांसाठी सरकारने स्क्रॅपिंग (Smartphone)धोरण लागू केले आहे. म्हणजेच जुनी वाहने स्क्रॅप करणे बंधनकारक असेल. याच पार्श्वभूमीवर मोबाइल फोन स्क्रॅपिंग धोरण राबविण्यात येत आहे. यामध्ये तुमच्या 5 वर्ष जुन्या फोनच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे, असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज खोटा असल्याचं समोर आलं आहे. मात्र, दूरसंचार विभागाकडून 5 वर्षे जुना फोन बंद करण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे असा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा.



पाच वर्ष जुना फोन तुम्ही वापरु शकणार नाही,असा दावा सध्या सोशल मीडियावर विशेषत: इन्स्टाग्रामवर केला जात आहे. हा दावा पूर्णपणे खोटा आहे.SAR नुसरा स्टॅंडर्ड व्हॅल्यू सेट केले जातात जे स्टँडर्ड व्हॅल्यू सगळ्या मोबाईल कंपनींना मानावे लागतात. स्मार्टफोनच्या बॉक्सवर SAR व्हॅल्यूचे डिटेल्स दिलेले असतात. सोशल मीडियावर  फिरत असलेला मेसेज खोटा असल्याचं समोर आलं आहे. कारण अजून दूरसंचार विभागाकडून 5 वर्षे जुना फोन बंद करण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत मोबाईल फोनमधून किती रेडिएशन उत्सर्जित होते? हे SAR व्हॅल्यू ठरवत असते. आपण वापरत असलेल्या प्रत्येक फोनची SAR व्हॅल्यू वेगवेगळी असते. मोबाईलची SAR व्हॅल्यू  1.6 W/Kg पेक्षा जास्त असू नये. असं असेल तर तो फोन आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो. SAR व्हॅल्यू संदर्भात 1 सप्टेंबर 2013 मध्ये सरकारने हा नियम जारी केला होता. 



 SAR व्हॅल्यू कसे तपासावे?


फोनची SAR व्हॅल्यू तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. एक तर तुम्ही फोनच्या युजर मॅन्युअलवर चेक करा. त्याच वेळी, काही कंपन्यांचे SAR व्हॅल्यू फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख त्याच्या अधिकृत वेबसाइटवर करा. आपण ते मॅन्युअली देखील तपासू शकता. 


चला तर मग जाणून घेऊया यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?


-सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या डायल पॅडवर जावे लागेल.
-येथे तुम्हाला *#07# टाइप करावे लागेल.
-हा कोड टाकताच SAR व्हॅल्यूचा तपशील तुमच्या स्क्रीनवर येईल. येथे आपल्याला दोन प्रकारची SAR व्हॅल्यू दिसतील. एक शरीरासाठी आणि दुसरा डोक्यासाठी किती सुरक्षित आहे याची माहिती देईल. 


इतर महत्वाची बातमी-


Mobile Charger Care Tips : Smartphone च्या चार्जरचा देखील होऊ शकतो स्फोट; तुमच्या चार्जरवर हे Symbols आहेत का?