Ayushmann Khurrana : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) नुकताच अयोध्येला जाऊन आला आहे. राम मंदिरातील (Ram Mandir) प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अभिनेता उपस्थित होता. पण आता तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. दुबईत 2017 मध्ये एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्याने 'दिल दिल पाकिस्तान' (Dil Dil Pakistan) हे गाणं गायलं होते. दरम्यान आयुष्यमानचा जुना आणि अर्धवट व्हिडीओ व्हायरल झाल्याने नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. आयुष्मान खुरानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आयुष्मान एका कॉन्सर्टमध्ये 'दिल दिल पाकिस्तान' हे गाणं गाताना दिसत आहे. या गाण्याच्या माध्यमातून अभिनेत्याने पाकिस्तानला दिल आणि जान म्हटलं असल्याने त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.


कॉन्सर्टमध्ये काय घडले होते? खरी परिस्थिती काय?


दुबईत 2017 मध्ये एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टमध्ये अली झफर आणि आयुष्यमान खुराना यांनी लाईव्ह पर्फामन्स दिला होता. दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत यासाठी हा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. तेव्हाची भारत-पाकिस्तान संबंधाची परिस्थिती वेगळी होती. अली झहरने दिल दिल पाकिस्तान हे गाणे गायला सुरुवात केली आणि आयुष्यमानने त्याला जॉईन केले. आयुष्यमानने देखील चक दे इंडिया हे गाणे गायला सुरुवात केली. त्यानंतर अली झहरही चकदे इंडिया हे गाणे गाण्यासाठी जॉईन झाला होता. 


आयुष्मान खुराना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर


आयुष्मान खुरानाला नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत. अभिनेत्याने पाकिस्तानी गायक कैफीचं 'दिल दिल पाकिस्तान' हे गाणं गायलं आहे. अभिनेत्याला पाकिस्तानी गाणं गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 






पाकिस्तानी आपल्या सैनिकांना ठार मारत असताना दुसरीकडे आयुष्यान त्यांचं गाणं गात आहे, राम मंदिराला पाहून रडणारा आणि बाबरी मस्जिदला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये आयुष्यमानचं नाव आहे. आपण या अभिनेत्याचे सिनेमे का पाहतो? या कलाकारांचा प्रामाणिकपणा कुठे आहे? पाकिस्तानचं कौतुक करणाऱ्या अभिनेत्याला राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण का दिलं? देशद्रोही, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. 


राम मंदिराच्या उद्घाटनाला आयुष्मान खुरानाची हजेरी


आयुष्मान खुरानाला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. त्याने लिहिलं होतं,"युवा आयकॉन आयुष्मान खुरानाला 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिराच्या उद्धाटनाचं आमंत्रण देण्यात येत आहे". आयुष्मान खुराना हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता, गायक, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक लोकप्रिय हिंदी सिनेमांत त्याने काम केलं आहे. अभिनेत्याच्या आगामी कलाकृतींची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Border 2 : सनी देओलच्या 'बॉर्डर 2'मध्ये आयुष्मान खुरानाची एन्ट्री! चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली