Azim Premji : विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी (Azim Premji) यांनी त्यांच्या दोन मुलांना कंपनीचे सुमारे 1 कोटी शेअर्स भेट दिले आहेत. या शेअर्सची किंमत 500 कोटी रुपये आहे. ऋषद प्रेमजी (Rishad Premji) आणि तारिक प्रेमजी (Tariq Premji) अशी त्यांच्या मुलांची नावे असून, त्यांनी ही भेट देण्यात आली आहे.
गिफ्ट दिलेले शेअर्स हे विप्रोच्या भाग भांडवलाच्या 0.20 टक्के
मिळालेल्या माहितीनुसार, अझीम प्रेमजी यांनी मुलांना दिलेले हे शेअर्स विप्रोच्या भाग भांडवलाच्या 0.20 टक्के आहेत. अझीम प्रेमजी यांनी त्यांचा मुलगा ऋषद प्रेमजी यांना विप्रोचे 51,15,090 इक्विटी शेअर्स भेट दिले आहेत. तर तारिक प्रेमजी यांनाही तेवढेच शेअर्स भेट देण्यात आले आहेत.
ऋषद आणि तारिक प्रेमजी यांचा विप्रोमधील हिस्सा 0.13 टक्क्यांपर्यंत
ऋषद प्रेमजी सध्या विप्रोचे अध्यक्ष आहेत. तर, तारिक प्रेमजी हे विप्रो एंटरप्रायझेसचे कार्यकारी संचालक आहेत. या व्यवहारामुळं कंपनीच्या एकूण प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाच्या शेअरहोल्डिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या व्यवहारानंतर अझीम प्रेमजी यांचा विप्रोमधील स्टेक 4.3 टक्क्यांवर आला आहे. तसेच ऋषद प्रेमजी आणि तारिक प्रेमजी यांचा हिस्सा 0.13 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
प्रेमजी कुटुंबाची हिस्सेदारी किती?
विप्रोमध्ये प्रेमजी कुटुंबातील सदस्यांची एकूण भागीदारी 4.43 टक्के आहे. यामध्ये अझीम प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांच्या 0.05 टक्के स्टेकचाही समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत, विप्रोमधील एकूण प्रवर्तकांचा हिस्सा 72.90 टक्के होता.
कंपनीचे मार्केट कॅप 2,48,185.23 कोटी रुपये
मिळालेल्या माहितीनुसार, विप्रोचा बुधवारी (25 जानेवारीला) शेअर हा 478 रुपयांवर बंद झाला होता. आज दुपारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 0.69 टक्क्यांनी घसरून 474.70 रुपयांवर व्यवहार करत आहेत. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 2,48,185.23 कोटी रुपये होते. विप्रो शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 526.45 रुपये आहे. ही पातळी 15 जानेवारीला पोहोचली होती. त्याच वेळी, त्याची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 17 एप्रिल 2023 रोजी 351.85 रुपये होती. विप्रोचा शेअर 2 रुपये दर्शनी मूल्यावर व्यवहार करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: