No Entry Sequel : बॉलिवूडमधील विनोदी कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. नो एन्ट्री (No Entry) या चित्रपट हा देखील कॉमेडी कथानकावर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट आजही लोक आवडीनं पाहतात. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होणार आहे. नो एन्ट्रीच्या सिक्वेलबाबत चित्रपट दिग्दर्शक अनीस बज्मी (Anees Bazmee) यांनी माहिती दिली.
सलमानसोबतच 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका
नो एन्ट्री हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सलमान खान, फरदीन खान, अनिल कपूर या कलाकारांनी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. एसके फिल्म एंटरटेनमेंट, सहारा वन मोशन पिक्चर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.
आता लवकरच या चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटिंगला सुरूवात होणार असल्याची माहिती अनीस बज्मी यांनी एका मुलाखतीमध्ये दिली. अनीस बज्मी यांनी सांगितलं, 'सलमान या प्रोजेक्टसाठी उत्सुक आहे. या चित्रपटाची शूटिंग लवकर सुरू व्हावी, अशी त्याची इच्छा आहे. मी त्याला चार ते पाच वेळा भेटलो आहे. तेव्हा त्यांनी लवकर शूटिंग सुरू करण्याबाबत सांगितलं '
अनीस बज्मीनं नो एन्ट्रीच्या सिक्वेलबाबत सांगितलं की, सलमान खान, अनिल कपूर, ईशा देओल,लारा दत्ता, बिपाशा बसु, सेलीना जेटली आणि समीरा रेड्डी हे कलाकार या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे. नो एन्ट्रीच्या सिक्वेलची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
हेही वाचा :
- Lock Upp : ‘खूप प्रयत्न केले आई होण्यासाठी, पण...’, कंगनाच्या जेलमध्ये पायल रोहतगीला अश्रू अनावर!
- ‘माता सीता’च्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचल्या, आता राजकारणातही सक्रिय झाल्या दीपिका चिखलिया!
- Irrfan Khan Death Anniversary: ‘सलाम बॉम्बे’ ते ‘अंग्रेजी मीडियम’, ‘या’ चित्रपटांमधून कायम लक्षात राहील इरफान खान!
- Sairat : मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचातील 'मानाचा तुरा' ; सैराटची सहा वर्षपूर्ती