Payal Rohatgi : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या ‘लॉक अप’ (Lock Upp) हा शो होस्ट करत आहे. ‘सेलिब्रिटी इन जेल’ अशी या शोची संकल्पना आहे. यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सहभागी झालेल्या कलाकारांना आपल्या आयुष्यातील अनेक गुपित थेट नॅशनल टीव्हीवर सांगावी लागतात. या खेळत आतापर्यंत अशी अनेक खळबळजनक गुपित उघड झाली आहेत. मात्र, नुकतंच अभिनेत्री पायल रोहतगीने (Payal Rohatgi ) तिच्या आयुष्यातील जे रहस्य उघड केलं, ते ऐकून सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आलं.


‘लॉक अप’ या शोचा एक नवा प्रोमो सध्या चर्चेत आला आहे. या प्रोमो व्हिडीओ अभिनेत्री आणि लॉकअप शोची स्पर्धक असणाऱ्या पायल रोहतगी हिने आपल्या आयुष्यातील सर्वात दुःखद रहस्य कॅमेरासमोर उघड केलं आहे. यावेळी पायलला अश्रू अनावर झाले होते.


काय म्हणाली पायल?


पायल रोहतगीने 'लॉक अप' शोमध्ये सांगितले की, ती गेल्या अनेक वर्षांपासून आई बनण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु प्रत्येक वेळी ती अपयशी ठरली. पायल रोहतगी कॅमेऱ्यासमोर आली आणि म्हणाली की, 'मला काही बोलायचे आहे. मला खूप वाटतं की, मलाही मुलं असावीत, पण मी आई होऊ शकत नाहीय.’ आपलं दुःख व्यक्त करताना पायलच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ती कॅमेऱ्यासमोर रडायला लागली. रडतच पायल म्हणाली की, 'आम्ही मागील चार-पाच वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी मी IVF देखील केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि लोक मला आता यावरून ट्रोल देखील करू लागले आहेत.’



ती म्हणाली की, ‘संग्रामला मुलं खूप आवडतात. त्याला स्वतःची मुलं असलाच हवीत. मी त्याला दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यास सुचवले, पण त्याने स्पष्ट नकार दिला.’ प्रत्येक महिलेने वयाच्या 20व्या वर्षी ‘एग्ग्स फ्रीज’ करण्याची प्रक्रिया करून घेतली पाहिजे, जेणेकरून वयाच्या 30व्या वर्षात मूल जन्माला घालण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत, असा सल्ला देखील तिने चाहत्यांना दिला.


हेही वाचा :