Irrfan Khan : बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याची आज दुसरी पुण्यतिथी आहे. दोन वर्षांपूर्वी या अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला होता. इरफानने हिंदीसोबतच ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांमध्येही उत्तम काम केले होते. 'ज्युरासिक पार्क', 'अंग्रेजी मीडियम', 'हिंदी मीडियम', 'लाइफ ऑफ पाय' सारखे संस्मरणीय चित्रपट देणाऱ्या इरफान खानने 29 एप्रिल 2020 रोजी न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरशी संघर्ष करता करता या जगाचा निरोप घेतला.


आज भलेही अभिनेता इरफान खान आपल्यात नसेल, पण त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून तो नेहमीच प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये जिवंत राहील. ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या इरफान खान याचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा शेवटचा चित्रपट ठरला. आपल्या कारकिर्दीत त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.


सलाम बॉम्बे


इरफान खानला मोठ्या पडद्यावर झळकण्याची पहिली संधी 1988मध्ये मीरा नायर याच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटामध्ये मुंबईच्या रस्त्यावर आणि झोपडपट्ट्यांमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांच्या वेदना पडद्यावर चितारल्या गेल्या होत्या. या चित्रपटात इरफान खानसोबत रघुवीर यादव, अनिता कंवर, नाना पाटेकर, अंजान, अमृत पटेल आणि चंद्रशेखर नायडू या कलाकारांनी काम केले होते.



द वॉरियर


'द वॉरियर' हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता. या चित्रपटात इरफान खान ‘योद्ध्या’च्या भूमिकेत दिसला होता. आपल्या दमदार अभिनयाच्या आणि संवादफेकीच्या बळावर त्याने या चित्रपटामधून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले होते.



पान सिंह तोमर


‘पान सिंह तोमर’ या चित्रपटासाठी इरफानला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपटाची कथा पान सिंह तोमर नावाच्या पात्राची कथा आहे, जो सैन्यात भरती होतो आणि भारतीय राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकतो. मात्र, सेवानिवृत्तीनंतर प्रशासनाकडून त्याला कोणतेच सहाय्य मिळत नाही, तेव्हा तो चंबळचा प्रसिद्ध डाकू बनतो.



जुरासिक वर्ल्ड


'जुरासिक वर्ल्ड' हा इरफानच्या कारकिर्दीतील एक संस्मरणीय चित्रपट होता. हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी इरफानचा फ्लॉरेन्सच्या महापौरांनी त्याचा गौरव केला होता. हॉलिवूड दिग्दर्शक कॉलिन ट्रेवरो यांनीही या चित्रपटातील इरफानच्या अभिनयाचे कौतुक केले होते. या चित्रपटात इरफान खानने ज्युरासिक पार्कचे सीईओ आणि मालक सायमन मसरानी यांची भूमिका साकारली होती.



अंग्रेजी मीडियम


‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट इरफानच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खान, राधिका मदान, दीपक डोबरियाल आणि पंकज त्रिपाठी यांनी काम केले होते. कॅन्सरसारख्या आजाराशी लढताना इरफानने या चित्रपटात काम केले होते. मात्र, आजारपणामुळे तो या चित्रपटाच्या प्रमोशनला हजार राहू शकला नव्हता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.



हेही वाचा :