एक्स्प्लोर

पायाची शस्त्रक्रिया केली अन् अभिनेत्याचा हाकनाक जीव गेला, 12 वर्षांनी 5 डॉक्टर गोत्यात, नेमकं प्रकरण काय?

न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Mumbai: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये जुनिअर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या अभिनेता सलमान बाबर शाहच्या मृत्यूप्रकरणी 12 वर्षांनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पाच डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर परिसरातील दोन रुग्णालयांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर अनेक वर्षांनी कुटुंबीयांनी न्यायासाठी लढा दिल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित डॉक्टरांच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू आहे.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमानच्या आई नसीम शाह यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. एप्रिल 2014 मध्ये शूटिंगवरून परतताना सलमानला टेम्पोची धडक बसली होती. त्यानंतर त्याला वसईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्याच्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले आणि शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला.

या प्रकरणात शिवाजीनगर येथील मिलेनियम रुग्णालयातील डॉ. नियाझ अहमद खान, डॉ. इम्तियाज अहमद खान आणि डॉ. उमेश पिंपळे यांच्यासह चेंबूर येथील साई ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील डॉ. खालिद आणि डॉ. अमित शोभावत यांचा समावेश आहे.

एफआयआरनुसार, अपघातानंतर सलमानवर उपचार करण्यात आले; मात्र उपचारात झालेल्या त्रुटी, उशीर आणि शस्त्रक्रियेनंतर योग्य वैद्यकीय देखरेख न मिळाल्याने त्यांची प्रकृती बिघडत गेली. तसेच, या प्रकरणात महत्त्वाच्या वैद्यकीय नोंदी नष्ट केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

ऑपरेशन करताना वीजपुरवठा खंडित 

दरम्यान, ऑपरेशन करण्यासाठी जवळच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत त्यावेळी त्यांनी इतक्या दूर दाखल करण्यापेक्षा जवळच्या रुग्णालयात दाखल करा, असा सल्ला देत मिलेनियम रुग्णालयाचे नाव सुचवले. त्यानुसार सलमान याच्या कुटुंबीयांनी त्याला या रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनीदेखील शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार सलमान याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरू असतानाच रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला. प्रकृती बिघडत गेली शस्त्रक्रिया झाल्यानंतर अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे रक्त चढवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या वेळी वैद्यकीय नोंदींमध्ये मृत्यू नैसर्गिक असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच शवविच्छेदनही करण्यात आले नव्हते. मात्र, कालांतराने कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget