एक्स्प्लोर

सलमान खानचे वडील रुग्णालयात, सलीम यांची प्रकृती बिघडली; बापाची काळजी घेणारा लेक हॉस्पिटलमध्ये..

Salim Khan health update and latest news: बॉलिवूड लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल.

Salim Khan hospitalized in Mumbai: सिनेसृ्ष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे.  बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते सलमान खानचे वडील सलीम खान यांची अचानक तब्येत बिघडली आहे.  त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सलीम खान यांची तब्येत नेमकी कशामुळे बिघडली? त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, आज सकाळी अभिनेता सलमान खान रुग्णालयाबाहेर दिसला.  सलमान खान  सध्या त्याच्या आगामी बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मात्र, आज तो कडक सुरक्षेत रुग्णालयाबाहेर दिसला.  रुग्णालयाबाहेरील सलमानचा व्हिडिओ समोर येताच चाहते चिंतेत पडले आहेत. सलीम खानच्या उत्तम आरोग्यासाठी चाहते सतत प्रार्थना करत आहेत. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान खानचे वडील सलीम खान हे 90 वर्षांचे आहेत.  खान कुटुंबाने त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती  जाहीर केलेली नाही.  सलमान खानने रुग्णालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधला नाही. सलीम खान यांना नेमकं कोणत्या कारणास्तव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे? याची माहिती समोर आलेली नाही. इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  या व्हिडिओत सलमान खान काळ्या रंगाचा टी शर्ट घालून हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. कडक सुरक्षेत त्याची गाडी रुग्णालयातून बाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्याच्या चेहऱ्यावर  तणाव स्पष्टपणे दिसत आहे.  तर, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अतुल अग्निहोत्री देखील लीलावती हॉस्पिटलमध्ये जाताना  दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वी सलीम खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सलीम खान  पूर्ण सुरक्षेसह समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलीम खान यांची तब्येत बिघडलेली दिसत आहे. दरम्यान, त्यांना अचानक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पापाराझींनी सलमानला हॉस्पिटलमधून बाहेर पडताना कैद केले आहे. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' घराबाहेर पडताच करण सोनावणेची 'ती' पोस्ट चर्चेत; पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार?

'पेट्रोल पंपावर प्रपोज...', पूजा बिरारीनं सोहम बांदेकरला कुठे घातली अंगठी; मुलाखतीत सांगितला अनोखा किस्सा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट? OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट? OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल

व्हिडीओ

Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Embed widget