Saiyaara Box Office Collection Day 5: कुठे शाहरुख अन् कुठे सलमान; 27 वर्षांच्या नवख्या स्टारनं सर्वांना चारली धूळ, 'सैयारा'नं 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोडले धडाकेबाज रेकॉर्ड्स
Saiyaara Box Office Collection Day 5: 'सैयारा' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमानं 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत या चित्रपटानं किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...

Saiyaara Box Office Collection Day 5: अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनित पड्डा (Aneet Padda) यांनी त्यांचा पहिला चित्रपट 'सैयारा'नं (Saiyaara Movie) धमाल केली आहे. हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करतोय आणि सर्वांना आश्चर्यचकित करतोय. चित्रपट पाहिल्यानंतर चाहते भावनिक होत आहेत. 'सैयारा' पाहताना थिएटरमधून लोकांचे रडतानाचे व्हिडीओ समोर येत आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा'नं अवघ्या 4 दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तसेच, 'सैयारा'नं भल्याभल्या सुपरस्टार्सना गुडघे टेकायला भाग पाडलं आहे.
'सैयारा'ची पाचव्या दिवशी दमदार कमाई
सॅक्निल्कच्या मते, चित्रपटानं पाचव्या दिवशी (रात्री 9 वाजेपर्यंत) 21.78 कोटी कमाई केली आहे. यानुसार, आतापर्यंत चित्रपटाचा एकूण संग्रह 129.03 कोटी झाला आहे. हे आकडे अंतिम नाहीत. त्यात काही बदल होऊ शकतात. यासह, चित्रपटानं सलमान खानच्या सिकंदरच्या लाईफटाईम कलेक्शनला (110.1 कोटी) मागे टाकलं आहे. तसेच, चित्रपटानं शाहरुख खानच्या डंकीलाही मागे टाकलं आहे. शाहरुखच्या 'डंकी' सिनेमानं पाच दिवसांत 128 कोटी रुपये कमावले होते.
View this post on Instagram
'सैयारा'नं सुपरस्टार्सच्या सिनेमांना पछाडलं
'सैयारा'नं अक्षय कुमारच्या 'केसरी 2'च्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलं आहे. या चित्रपटानं आलिया भट्ट आणि वरुण धवनचा पहिला चित्रपट स्टुडंट ऑफ द इयर (70 कोटी) आणि जान्हवी कपूरचा धडक (73 कोटी) यांनाही मागे टाकलं आहे.
रेकॉर्ड ब्रेकिंग रोमँटिक ड्रामा
'सैयारा'नं दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केलं आहे. हा चित्रपट 60 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. हा चित्रपट मोहित सुरीचा बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 4 दिवसांत (ओपनिंग वीकेंड) 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला रोमँटिक चित्रपट ठरला आहे.
दरम्यान, 'सैयारा'नं 21.5 कोटींची ओपनिंग झाली होती. दुसऱ्या दिवशी फिल्मनं 26 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी फिल्मनं 35.75 कोटींचं कलेक्शन केलेलं. तर चौथ्या दिवशी फिल्मनं 23.5 कोटींचं कलेक्शन केलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























