Saif Ali Khan : बॉलिवूडमध्ये नेपोटिजम आणि स्टार लोकांच्या मुलांना मिळणाऱ्या संधी याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. अनेकदा या मुद्यांवरुन वादही सुरु आहे. आता बॉलिवूड (Bollywood) सर्वांत लोकप्रिय कपल म्हणजेच करिना कपूर-खान आणि सैफअली खान (Saif Ali Khan) यांनी नेपोटिजमाबाबत भाष्य केले आहे. 'आज तक'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या अभिनेत्री करिनाचे (Kareena Kapoor) दोन्ही मुलं सोशल मीडियावर सेलिब्रिटींपेक्षा कमी नाहीत. तैमूर आणि जेहला लोकांचा प्रतिसाद मिळतो तेवढा बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनाही मिळत नाही. आपल्या मुलांना मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादाबद्दल दाम्पत्याने भाष्य केलं आहे.
आमच्या मुलांना स्टारकिड जनता बनवते : सैफ
स्टारकिड असलेल्या मुलांना सिनेक्षेत्रात लवकर संधी कशामुळे मिळतात? या प्रश्नाला सैफने उत्तर दिले आहे. "जनता स्टारकिडमध्ये जास्त इंटरेस्ट घेते. त्यांचे सातत्याने फोटो घेतले जातात. त्यांना सोशल मीडियावर फॉलो केले जाते. यातील कोण उद्या सिनेमा बनवण्यासाठी इच्छुक असेल तर ते काही रॉकेट सायन्स नाही. कोणालाही सिनेमा बनवू, असे वाटू शकते. तुम्हाला ठरवावे लागेल, यांना प्रतिसाद का आणि कोठून मिळतोय", असे सैफ अली खान म्हणाला.
आम्ही मुलं जन्माला घालतो, त्यांना 'स्टारकिड' तुम्ही बनवता
अभिनेता सैफअली खान म्हणाला, "आम्हाला लोकांचे अटेंशन नको आहे. आम्ही स्टारकिड बनवत नाहीत. आम्ही केवळ मुलांना जन्माला घालतो. त्यांना स्टारकिड मीडिया, फोटोग्राफर्स आणि जनता स्टारकिड बनवते. जनता स्टारकिडला पाहू इच्छित असते. लोकांच्या मनात असते की, हा मोठ्या स्टारचा मुलगा आहे. "
'तुमचं आडनाव म्हणजे टॅलेंटची गॅरेंटी नाही'
अभिनेत्याच्या आडनावात फिल्मी फॅमिलीचे नाव असले तर फायदा होतो का? असा सवाल करिनाला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला प्रत्यु्त्तर देताना करिना म्हणाली, तुमचं आडनाव, फॅमिली बॅकग्राऊंड काहीही असो, "याचा अर्थ असा नाही की तुमच्यात टॅलेंट आहे, तुम्ही यशस्वी व्हाल की नाही, हा निर्णय प्रेक्षकांवर असतो."
पुढे बोलताना करिना म्हणाली, "लोक फार उत्सुक असतात. तुमचे 40 मिलीयन फॉलोअर्स आहेत. तुम्हाला 30 हजार लाईक्स मिळतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही स्टार झालात. तुम्हाला ते सिद्ध करावे लागते. तुमच्या कामातून समजले पाहिजे की, तुम्ही स्टार आहात."
इतर महत्वाच्या बातम्या