WhatsApp Upcoming Feature : व्हॉट्सअॅप (Whatsapp) कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे फिचर्स घेऊन येत असते. जेणेकरून यूजर्स वेळोवेळी अपडेट राहतील तसेच, व्हॉट्सअॅप अॅपकडे आकर्षित राहतील. यामुळेच व्हॉट्सअॅप हे तरूणांमध्ये लोकप्रिय अॅप आहे. आता व्हॉट्सॲपचं आणखी एका फीचरवर काम सुरु आहे. ज्याद्वारे यूजर्स व्हॉट्सॲपवरूनच थर्ड पार्टी ॲप्सशी चॅट करू शकतील. खरंतर, मेटाचा हा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म थर्ड पार्टी ॲप्ससह चॅटिंग फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर यूजर्स व्हॉट्सॲपवरूनच इतर कोणत्याही ॲपवर मेसेज पाठवू शकतील.


व्हॉट्सॲपमध्ये येणार कूल फीचर


सोशल मीडियावरील एका अहवालात असे म्हटले जात आहे की, युरोपियन युनियनच्या डिजिटल मार्केट कायद्याच्या दबावाखाली हे वैशिष्ट्य मार्चपर्यंतच आणले जाऊ शकते. डिक ब्रॉबर हे WhatsApp चे अभियांत्रिकी संचालक आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, WhatsApp आपल्या 200 कोटी यूजर्सच्या थर्ड पार्टी ॲप्ससह चॅटिंगची सुविधा देण्यासाठी इंटरऑपरेबिलिटी ऑफर करण्यास तयार आहे. त्यांनी सांगितले की व्हॉट्सॲपची गोपनीयता, सुरक्षितता आणि एकता लक्षात घेऊन आम्ही थर्ड पार्टी ॲप्सना इंटरऑपरेबिलिटी ऑफर करत आहोत. 


टेलिग्राम सपोर्ट करणार की नाही?


व्हॉट्सॲपचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असलेलं टेलिग्राम अॅप व्हॉट्सॲपसह इंटरऑपरेबिलिटीला समर्थन देण्यासाठी तयार आहे की नाही याबद्दल अद्याप कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही. टेलिग्राम सुरुवातीपासूनच व्हॉट्सॲपला टक्कर देत आहे आणि त्या ॲपमध्ये यूजर्सना काही फीचर्स मिळतात जे व्हॉट्सॲपमध्ये उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपचे यूजर्स एकमेकांच्या ॲप्सद्वारे एकमेकांशी चॅटिंग करू लागले तर हे अनोखं वैशिष्ट्य असणार आहे. 


यूजर्सन 'या' सुविधा मिळणार आहेत


मेटाने फेसबुक मेसेंजर सारख्या इतर चॅटिंग प्लॅटफॉर्म तसेच इतर चॅटिंग ॲप्सचा आधार घेण्याची तयारी केली आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर यूजर्स टेक्स्ट मेसेजिंग, फोटो पाठवणे, व्हॉइस मेसेज पाठवणे, व्हिडीओ पाठवणे आणि फाईल ट्रान्सफर करणे यांसारख्या फीचर्सचा वापर करू शकतील. सध्या या सुविधेद्वारे, व्हॉट्सॲप यूजर्स इतर ॲप्सच्या वापरकर्त्यांसोबत ग्रुप चॅट किंवा कॉल करू शकणार नाहीत. हे वैशिष्ट्य नंतर जोडले जाईल. अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. आता यूजर्ससाठी हे अॅप कधी सुरु होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Technology : मायक्रोसॉफ्ट तब्बल 20 लाख भारतीयांना देणार AI ट्रेनिंग; सीईओ सत्या नडेला यांची मोठी घोषणा