Vikrant Massey Baby : अभिनेता विक्रांत मेस्सीच्या 12 फेल या सिनेमाने मोठे यश मिळवले. दरम्यान विक्रांतच्या आनंदात आणखी भर पडली आहे. विक्रांत मेस्सी बाबा बनला आहे. त्याची पत्नी शितल ठाकूर याने गुडन्यूज दिली आहे. शितलने मुलाला जन्म दिलाय. अभिनेता विक्रात मेस्सीने ही खूशखबर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. 


इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती 


विक्रांत मेस्सीने आज (दि.7) इन्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून बाबा झालो असल्याची घोषणा केली. अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शितल ठाकूर हिने मुलाला जन्म दिल्याचे स्पष्ट केले आहे. विक्रांत आणि शितलने संयुक्तपणे खुशखबर दिली आहे. खुशखबर देताना मेस्सी दाम्प्त्याने एक नोटही लिहिली आहे. या नोटमध्ये मेस्सीने लिहिले की, "आता आमच्याकडे पण एक आहे. आम्ही आमच्या मुलाचे आगमन झाले असल्याची घोषणा करत आहोत. आमचा आनंद गगनात मावत नाहीये. विक्रांत आणि शितलकडून भरपूर प्रेम"






विक्रांत आणि शितलची लवस्टोरी 


अभिनेता विक्रांत मेस्सीने 24 डिसेंबर 2023 रोजी एका फोटोच्या माध्यमातून पत्नी प्रेग्नंट असल्याची घोषणा केली होती. विक्रांत आणि शितल काही काळ एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांनी विवाह उरकला होता. विवाहानंतर विक्रांत वैवाहिक जीवनाबाबत भाष्य केले होते. वैवाहिक जीवन अतिशय सुंदर आहे. मी माझ्या सर्वांत चांगल्या मैत्रिणीसोबत लग्न केले, याच्यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही, असे मत विक्रांतने व्यक्त केले होते. 


कशी आहे विक्रांत मेस्सीची कारकिर्द?


नुकतेच विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12 वी फेल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विक्रांत मेस्सी या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमाला प्रक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आगामी अनेक सिनेमांतूनही विक्रांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विक्रांत पुढील सिनेमांमध्ये 'फिर आई हसीन दिलरुबा' आणि 'सेक्टर 36' यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. 


विवाहाच्या 2 वर्षांनंतर आली गुडन्यूज 


 विक्रांत मेसी आणि शितल ठाकूर 14 फेब्रुवारी 2022 रोजी विवाहबंधनात अडकले होते. दोघांनी परंपरेनुसार, विधी करत हा विवाह उरकला होता. विक्रांतने विवाहाबाबत माहिती सांगितली नव्हती. सोशल मीडियावर फोटो लीक झाल्यामुळे सर्वांना माहिती मिळाली. दरम्यान, विवाहाच्या दोन वर्षांनी विक्रांत मेस्सीच्या घरात गुडन्यूज आली आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या 


Telly Masala : छावा सिनेमाच्या शूटींगदरम्यान विकी कौशलला अपघात ते अॅनिमलमधील भाभी 2 च्या बोल्ड सीनपेक्षाही मादक अदा!