Best Mutual Fund: भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी गुंतवणूक (Investment) करणं गरजेचं आहे. गुंतवणूक करताना लोक दोन गोष्टींचा विचार करतात. एक म्हणजे आपली ठेव सुरक्षीत आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ठेवीवर किती परतावा मिळतो. दरम्यान, चांगला परतावा मिळणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होतो. करावी. आयसीआयसीआय पीआरयू इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड (ICICI PRU India Opportunities Fund) गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट झाले आहेत.
शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. डायरेक्ट एक्सपोजरच्या तुलनेत म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवणुकीत कमी जोखीम असते. कधीकधी बेंचमार्कपेक्षा चांगला परतावा देखील मिळतो. यामुळेच म्युच्युअल फंड हे लोकांसाठी गुंतवणुकीचे पसंतीचे साधन बनत आहेत.आज आम्ही तुम्हाला अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवताना मोठ्या फरकाने बेंचमार्क मागे टाकला आहे. ICICI प्रुडेंशियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाने पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास तिप्पट केले आहेत.
ICICI प्रुडेंशियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाबद्दल माहिती
ICICI प्रुडेंशियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड हा सुमारे पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. या पाच वर्षांत त्याचा ट्रॅक रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या म्युच्युअल फंडात सुरुवातीला म्हणजेच 15 जानेवारी 2019 रोजी 10 लाख रुपये गुंतवले असतील, तर 5 वर्षांनी म्हणजेच 15 जानेवारी 2024 रोजी त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 28 लाख रुपये झाले. यावरुन असे दिसून येते की फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मागील पाच वर्षात 22.9 टक्के CAGR वर परतावा दिला आहे. त्या तुलनेत, गेल्या पाच वर्षांत बेंचमार्क निफ्टी 500 TRI चा CAGR 19 टक्के आहे. ICICI प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाने पाच वर्ष आणि तीन वर्ष आणि एक वर्षाच्या कालावधीत बेंचमार्कला मागे टाकले आहे. गेल्या एका वर्षात, बेंचमार्क 30.6 टक्क्यांनी वाढला आहे, तर फंडाचा परतावा 38.1 टक्के आहे. 3 वर्षांच्या कालावधीबद्दल बोलायचे झाल्यास, फंडाने 37.7 टक्के CAGR दिला आहे, तर बेंचमार्कचा CAGR 19.8 टक्के आहे.
SIP च्या बाबतीत देखील, ICICI प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाने उत्कृष्ट कमाई केली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने फंडाच्या सुरुवातीपासून दर महिन्याला 10-10 हजार रुपयांची SIP केली असती, तर त्याच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य 31 जानेवारी 2024 पर्यंत 12.58 लाख रुपये झाले असते. ICICI प्रुडेंशियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड ही विशेष परिस्थितीच्या थीमवर आधारित इक्विटी ओरिएंटेड ऑफर आहे. हा फंड विशेष परिस्थितीतून जाणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो.
महत्वाच्या बातम्या: