एक्स्प्लोर

Sai Tamhankar On Marathi Award Functions: 'आपण मराठीसाठी आग्रह धरतो अन् अमराठी सेलिब्रिटींना पहिल्या रांगेत बसवतो'; इंडस्ट्रीतल्या विसंगतीवर सई ताम्हणकर चिडली

Sai Tamhankar On Marathi Award Functions: सई ताम्हणकरनं एकीकडे मराठीचा आग्रह आणि दुसरीकडे अमराठी कलाकारांना प्राधान्य हा मुद्दा परखडपणे मांडला. 

Sai Tamhankar On Marathi Award Functions: मराठी सिनेसृष्टीच्या (Marathi Film Industry) आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणारी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आजही लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. मराठमोळ्या सई ताम्हणकरनं (Marathi Actress
Sai Tamhankar) आजवर अनेक मराठी (Marathi Movie) आणि त्यासोबतच हिंदी सिनेमांमध्ये (Hindi Cinema) काम केलं आहे. ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई या ना त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. सईने मालिकांच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर तिनं थेट सिनेमांमध्ये एन्ट्री घेतली. आजवर तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण, 2013 मध्ये आलेल्या 'दुनियादारी' या सिनेमानं तिला वेगळी ओळख मिळवून दिली. 

आपल्या आजवरच्या करिअरमध्ये सईनं अनेक सिनेमे केले. त्यासोबतच अनेक विषयांवर सई आपलं मत अगदी निर्भिडपणे आपलं मत मांडताना दिसलीय. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आणखी एका मुद्द्याला हात घातला आहे. तो मुद्दा म्हणजे, मराठी पुरस्कार सोहळ्यांमध्ये अमराठी कलाकारांना आमंत्रित करुन त्यांना दिलं जाणारं प्राधान्य... तसेच अमराठी सेलिब्रिटींच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील दिग्गजांचा अपमान करतोय का? असा प्रश्नही तिनं उपस्थित केला आहे. सई ताम्हणकरनं नुकतीच 'विषय खोल' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना सईनं एकीकडे मराठीचा आग्रह आणि दुसरीकडे अमराठी कलाकारांना प्राधान्य हा मुद्दा परखडपणे मांडला.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

सई ताम्हणकर नेमकं काय म्हणाली? 

सई ताम्हणकर म्हणाली की, "आपण म्हणतो की मराठी बोला, मराठीसाठी आग्रह धरतो, पण, दुसरीकडे अनेकदा आपण पाहतो की, आजकाल पुरस्कार सोहळ्यांना इतर सिनेसृष्टीतील (अमराठी) कलाकारांना आमंत्रित केलं जातं. मात्र, या प्रक्रियेत एक मोठी विसंगती दिसून येते. अमराठी कोणी आर्टिस्ट आले की त्यांना आपण पहिल्या रांगेत बसवतो आणि ज्या ज्येष्ठ कलाकारांनी 30-40 वर्ष काम केलं आहे, त्यांना या भव्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनेकदा मागच्या रांगेत स्थान दिले जाते. हे मला अजिबात पटत नाही..."

पुढे बोलताना सई ताम्हणकर म्हणाली की, "मी समजू शकते की, तुमचा टीआरपी आणि फेस वॅल्यू, या सगळ्या गोष्टी समजून जरी घेतल्या तरी शेवटी तुम्ही एक मराठी अवॉर्ड फंक्शन करताय ना? आणि तुम्हीच म्हणता मराठी, मराठी, मराठी... शेवटी आपल्या बोलण्यातच विसंगती आहे. ती विसंगती जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत आपल्यालाच आपण सेलिब्रेट करण्याची हिंमत येणार नाही..."

"टीआरपी वाढवण्यासाठी आणि सोहळ्याला 'ग्लॅमर' प्राप्त करून देण्यासाठी दुसऱ्या फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांना अतोनात महत्त्व दिलं जातं. आज मागे बसलेले हेच ज्येष्ठ कलाकार एकेकाळी इतके लोकप्रिय होते की, त्यांच्या सिनेमाची तिकिटे 200-300 रुपयांत ब्लॅकनं विकली जायची. दुसऱ्या इंडस्ट्रीमधून आलेली लोक काहीतरी मोडकतोडक मराठी बोलणार ते आपण सेलिब्रेट करतो... आपण स्वतःला किती सेलिब्रेट करतोय आणि त्यात आपल्याला खरोखर आनंद मिळतोय का? हे पाहणं गरजेचं आहे...", असं सई ताम्हणकर म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rajpal Yadav Cheque Bounce Case: अमिताभ बच्चनसोबत स्टेजवर येऊ दिलं नाही, माधव अग्रवालांचा इगो दुखावला अन् राजपाल यादवला जेलमध्ये जावं लागलं; नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Embed widget