RRR Movie : एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'आरआरआर' (RRR) चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावरील सुरुवातीच्या प्रतिक्रिया पाहता, असे दिसतेय की राम चरण (Ramcharan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) या दोघांनीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. एकीकडे हा चित्रपट जरूर पाहावा, असे म्हटले जात असताना, दुसरीकडे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ऑनलाईन लीक झाला आहे.


एसएस राजामौली यांचा चित्रपट 'RRR' प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच इंटरनेटवर HD मध्ये लीक झाला. या बातमीमुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसू शकतो. अर्थात, एखाद्या मोठ्या चित्रपटाच्या ऑनलाईन लीकचा त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर मोठा परिणाम होतो. ‘RRR’ हा 350 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. मात्र, रिलीजपूर्वीच त्याचे बजेट वसूल झाले आहे.


या वेबसाईट्सवर चित्रपट लीक


'फिल्मीरॅप', 'तमिळ रॉकर्स' आणि 'मूव्ही रुल्स' नावाच्या वेबसाईट्सवर ‘RRR’ लीक झाला आहे. युझर्स हा चित्रपट बिनदिक्कतपणे डाऊनलोड करून पाहत आहेत. त्याच वेळी, काही चाहते लोकांना विनंती करत आहेत की, त्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्येच चित्रपट पाहावा. मात्र, या आवाहनाचा फारसा परिणाम होणार नाही. अनेकांनी हा चित्रपट डाउनलोड करून पाहिलाही आहे.


‘हे’ चित्रपटही झाले लीक!


'RRR' हा पायरसी साईटला बळी पडणारा पहिला चित्रपट नाही. अलीकडेच प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर 'राधे श्याम' देखील थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाईन लीक झाला होता. यापूर्वी '83', ‘पुष्पा’, ‘भीमला नायक’ यांसारखे मोठे चित्रपटही ऑनलाईन लीक झाले आहेत.


‘आरआरआर’ या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांची जोडी झळकली आहे. दोघांचेही दक्षिण आणि उत्तरेत जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. 'गंगूबाई' नंतर आलिया भट्टची लोकप्रियता खूप वाढली असून, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील हा आलियाचा डेब्यू चित्रपट आहे. अशा स्थितीत चित्रपटाला आणखी फायदा होण्याची अपेक्षा आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर एकाच चित्रपटात असल्याने चाहतेही खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड स्टार अजय देवगणही दिसणार आहे.


हेही वाचा:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha