मुंबई: शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स (Sensex) 223 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही ( Nifty) 69 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.41 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,362 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,153 वर पोहोचला आहे. आशियाई बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.


आज 1256 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1958 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 91 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा,आयटी, फार्मा, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक टक्क्यांहून अधिकची घसरण  झाली आहे. तर  रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.  


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • Bajaj Auto- 1.97 टक्के

  • Adani Ports- 1.34 टक्के

  • JSW Steel- 0.87 टक्के

  • Dr Reddys Labs- 0.76 टक्के

  • SBI- 0.74 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Titan Company- 3.61 टक्के

  • Tech Mahindra- 2.42 टक्के

  • Maruti Suzuki- 1.87 टक्के

  • Cipla- 1.51 टक्के

  • IOC- 1.49 टक्के


शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 226 अंकांची उसळण दिसून आली होती. मात्र काही वेळेतच नफा वसुली सुरू झाल्याने सेन्सेक्स घसरला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. नंतर ही स्थिती कायम राहिली आणि शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये आणि निफ्टीमध्ये घसरण झाली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -