एक्स्प्लोर

'छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता...'; रितेश देशमुखचं 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सक्सेस पार्टीतल्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण

Ritesh Deshmukh Clarification On Viral Video: 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सक्सेस पार्टीच्या व्हायरल व्हिडीओवरुन रितेश देशमुखचं जोरदार ट्रोलिंग झालं. अशातच आता रितेश देशमुखनं पोस्ट शेअर करुन स्पष्टीकरण दिलं आहे. 

Ritesh Deshmukh Clarification On Viral Video: रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Movie) सिनेमानं इतिहास घडवला असून बक्कळ गल्ला जमवला आहे. 'राजा शिवाजी' सिनेमानं भल्या भल्या दिग्गजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. अशातच सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर रितेश देशमुख यानं सिनेमाच्या टीमसाठी म्हणजेच, सिनेमासाठी झटलेल्या पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांसाठी छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत रितेश देशमुख 'राजा शिवाजी' सिनेमाचं टीशर्ट घालून आलेला. तसेच, पार्टीत डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. पण, जे कुणाच्या लक्षातही आलं नाही, तेच नेमकं नेटकऱ्यांनी हेरलं. पार्टीच्या व्हायरल व्हिडीओवरुन रितेश देशमुखचं जोरदार ट्रोलिंग झालं. अशातच आता रितेश देशमुखनं पोस्ट शेअर करुन स्पष्टीकरण दिलं आहे. 

अभिनेता रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला? 

अभिनेता रितेश देशमुख म्हणाला की, "नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या आनंदानिमित्त आमच्या संपूर्ण टीमने एक छोटेखानी आनंदोत्सव आयोजित केला होता. त्यासंबंधाने माझा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत होता. एक शिवप्रेमी आणि प्रेक्षककुटुंब या नात्याने मी याचे स्पष्टीकरण देणे माझं कर्तव्य मानतो. मी नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट परिधान करून आनंद साजरा करण्यामागे त्यांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता. तो टी-शर्ट मी चित्रपटाच्या प्रचारादरम्यान वापरत होतो. त्या दिवशीही मी प्रचारकार्य पूर्ण करून थेट कार्यक्रमात सहभागी झालो असल्याने टी-शर्ट बदलणे राहून गेले".


छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता...'; रितेश देशमुखचं 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सक्सेस पार्टीतल्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण

"मी आजवर कधीही मद्यपान केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही..."

पुढे रितेश देशमुखनं लिहिलंय की, "तसेच, माझ्याबाबत समाजमाध्यमांवर होत असलेल्या काही दाव्यांविषयीही स्पष्ट करू इच्छितो की, मी आजवर कधीही मद्यपान केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यामुळे या संदर्भातील कोणतेही आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीला संबंधित कार्यक्रमाचे निमंत्रणदेखील देण्यात आलेले नव्हते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन 'राजा शिवाजी' या चित्रपटासाठी साडेतीन वर्षे अथक परिश्रम घेतलेल्या, कॅमेरामागील आणि कॅमेरासमोरील सर्व कलावंत व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करण्यात आले होते. तथापि, माझ्या त्या कृतीमुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर एक शिवप्रेमी म्हणून मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो..."

"छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे, प्रेरणेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर, प्रेम आणि निष्ठा आहे. ही भावना आजही तितकीच दृढ आहे आणि कायम राहील. जय शिवराय आपला, रितेश विलासराव देशमुख", असं पुढे रितेश देशमुख यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Snehal Tarde On Deool Band 2: 'प्रवीणनं मी त्याची पत्नी आहे, म्हणून...'; 'देऊळ बंद 2'मधल्या मुख्य भूमिकेबाबत स्नेहल तरडेनं अखेर सांगून टाकलं

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Embed widget