राजा शिवाजी सिनेमातील रितेश देशमुखचा दुसरा लूक समोर, पाहा व्हिडीओ
Raja Shivaji Movie of Riteish Deshmukh : राजा शिवाजी सिनेमातील रितेश देशमुखचा दुसरा लूक समोर, पाहा व्हिडीओ

Raja Shivaji Movie of Riteish Deshmukh : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या छावा सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ऐतिहासिक सिनेमांबाबत प्रेक्षकांना किती उत्सुकता असते? हे दिसून आलंय. दरम्यान, आता अभिनेता रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) राजा शिवाजी (Raja Shivaji Movie) या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या शिवचरित्रावर आधारित राजा शिवाजी हा सिनेमा करतोय. विशेष म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन देखील तो स्वत:च करत आहे.
रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ
काही महिन्यांपूर्वी रितेश देशमुखचा सिनेमातील पहिला लूक त्याच्या फोटोंच्या माध्यमातून समोर आला होता. त्यानंतर या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. आता रितेशचा (Riteish Deshmukh) सिनेमातील दुसरा लूक समोर आलाय. रितेशने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये त्याचा दुसरा लूक दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करताना रितेशने (Riteish Deshmukh) लिहिले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत..
#राजाशिवाजी, 1 मे, 2026 मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम
"राजा शिवाजी" या सिनेमाची घोषणा रितेश देशमुखने 19 फेब्रुवारी 2024 रोजी, शिवजयंतीच्या दिवशी केली होती. हा सिनेमा रितेश स्वतः दिग्दर्शित करत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांने याआधी "वेड" हा गाजलेला सिनेमा दिग्दर्शित केला होता. शिवाजी महाराजांवरील चित्रपट करणे ही एक मोठी जबाबदारी आहे, असे रितेशने अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या चित्रपटाची निर्मिती अतिशय सखोल संशोधन, इतिहासाशी प्रामाणिक राहून आणि तांत्रिक दृष्टिकोनातून सुद्धा भव्यतेने केली जात आहे.
"राजा शिवाजी" हा सिनेमा शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते हिंदवी स्वराज्य स्थापनेपर्यंतचा त्यांचा संघर्ष, कर्तृत्व, शौर्य, दूरदृष्टी आणि लोकशाही मूल्यांची उभारणी हे सर्व दाखवलं जाणार आहे. विशेष म्हणजे, हा सिनेमा केवळ युद्धावर किंवा शौर्यगाथेवर आधारित नसून, शिवाजी महाराजांचे प्रशासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन देखील अधोरेखित करणारा असेल.
View this post on InstagramView this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
























